रा.जि.प.शाळा सोनसडे येथे शिवछत्रपती जंयती उत्साहात साजरी

तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील बिट शाळा सोनसडे येथे शिवछत्रपती जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून मुख्याध्यापक वंदन सापळे, उपशिक्षक तानाजी साळुंखे, गौतम मनवर, स्नेहा तार यांनी विद्यार्थ्यांसमवेत दर्शन घेतले.

     बहुजन पालक, रयतेचा राजा छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त सर्वाच्या उत्साहाला उधाण येतं असते.विदयार्थी, विद्यार्थीनीने आपल्या राजांच्या जिवनावर कुणी गिते कुणी भाषणे अशी जय्यत तयारी केली होती.यावेळी विद्यार्थीनीने शिवगित गाऊन अंगावर शहारे आणले.तर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जिवनावर भाषणे केली.

    शेवटी शिक्षकांनी छत्रपती शिवराय यांचे सर्वधर्म समभाव, अठरापगड जातींना घेऊन स्वराज्याची केलेली उभारणी, युद्ध निती, याविषयी अमोल असे मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog