शासनाचे कोणतेही अनुदान न घेता आदिवासी युवकाने निजामपुरात जिद्दीने थाटले भाजीचे दुकान,

 आदिवासी युवकाचे सर्वत्र कौतुक,

 दुकानाचे शानदार उद्घाटन

 आदिवासी युवकांनी प्रेरणा घेण्याची गरज!

  रायगड (भिवा पवार) डोंगर दर्‍यात राहणारा आदिवासी समाज आज रोजगारापासून वंचित आहे पोटाची खळगी भरण्यासाठी तो ऊसतोडी वीट भट्टी कोळसा भट्टी साठी परप्रांतात जातो मात्र याला अपवाद आहे निजामपूर येथील आदिवासी वाडीतील राम कोळी,या युवकाने आठवीपर्यंत शिक्षण घेऊन कुठेही इकडे तिकडे नोकरी न करता निजापूर येथे जिद्दीने भाजीचे दुकान थाटले आहे. त्यांनी तीन एकर मध्ये भाजीची शेती केली आहे. भाजी ताजी व स्थानिक परिसरातून उपलब्ध केली जात असल्यामुळे भाजी घेणार्‍यांचा सुद्धा कल राम कोळी यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरातील येरद आदिवासी वाडीतील राहणारा 35वर्षीय युवक राम महादेव कोळी या युवकाने न डगमगता तीन एकर शेती भाड्याने घेऊन त्या शेतीमध्ये कारली, शिराळी, भेंडी, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, घेवडा, गवार इत्यादी अनेक प्रकारची भाजी लागवड केली असून या भाजीची सुरुवात झाल्यानंतर निजामपूर शहरात भाजीचे भले मोठे दुकान थाटले आहे

 या भाजी व्यवसाय मध्ये त्यांच्या पत्नी वैदेही कोळी यांचीही खूप मोलाची साथ असून या भाजीच्या दुकानाचे नुकतेच उद्घाटन बहुजन युथ पॅंथरचे जिल्हा युवक अध्यक्ष रोहनभाई शिर्के व मराठी उद्योजक प्रवीण दबडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बहुजन युथ पॅंथरचे महासचिव सुशीलभाई कासारे, दक्षिण रायगड आदिवासी संघटनेचे माणगाव अध्यक्ष उमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत घाडगे, वाकी ग्रामपंचायत सदस्य नथुराम जाधव, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार, निजामपुर आदिवासी संघटनेचे अध्यक्ष नथुराम वाघमारे, उपाध्यक्ष दत्ता पवार, उद्योजक गणेश शेठ पवार, आदिवासी कार्यकर्ते रमेश जाधव, राजा वाघमारे,दिलीप पवार, एकनाथ हिलम, त्रिभुवन पवार, एकनाथ वाघमारे, मंगेश वालेकर, विश्वनाथ पवार, इत्यादी अनेक आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाची कोणतीही आर्थिक मदत अनुदान न घेता स्वतःच्या जिद्दीवर तीन एकर मध्ये शेती करून भाजीचे दुकान थाटणाऱ्या राम कोळी व त्यांच्या पत्नी वैदेही कोळी यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या या जिद्दीची प्रेरणा खरच आदिवासी युवकांनी घेण्याची गरज आहे.




 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने होतकरूआदिवासी तरुणांना प्राधान्य देण्याची गरज:- रोहनभाई शिर्के

आदिवासी समाजाचा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक विकास व्हावा शासनाने आदिवासी समाजाचे कल्याण व्हावे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पची शासनाने स्थापना केली असून केली असून हे कार्यालय रायगड जिल्ह्यातील पेण येथे असूनही आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही.आदिवासी समाजाच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये असतात मात्र रायगड मधील आदिवासी समाजाचा विकास हा कागदावरच पाहायला मिळतो आदिवासी विकास प्रकल्पाने अशा राम कोळी सारख्याआदिवासी तरुणांना अर्थसहाय्य देऊन त्याला सहकार्य करायला पाहिजे. मात्र येथील गरीब आदिवासी आदिवासी तरुणांना अर्थसहाय्य न देता ज्यांचे राजकीय वजन आहेत अशांनाच अर्थसहाय्य दिले जात असल्याचा आरोप बहुजन युथ पॅंथरचे जिल्हा युवक अध्यक्ष रोहनभाई शिर्के यांनी केला असून यांनी केला असून या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनपणा बाबत भोंगळ कारभाराबाबत बहुजन युथ पॅंथर लवकर जाब विचारणार असल्याचे रोहनभाई शिर्के यांनी उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Comments

Popular posts from this blog