रायगड जिल्हा विविध स्पर्धा व गणित संबोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

 गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रायगड जिल्हा व पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापकमंडळातर्फे चालू शैक्षणिक वर्षात आयोजित विविध स्पर्धा व जिल्हास्तरीय गणित संबोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सु.ए. सो. चे के. अ. बांठिया विद्यालय पनवेल येथे संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेश खामकर, वरिष्ठ विस्तार अधिकारी एस. आर. मोहिते. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी. एस्. माळी , पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत , मुख्याध्यापक संदेश पाटील, प्रशांत मोकल , पांडुरंग हंबीर , पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, रोहा तालुका समन्वयक टिळक खाडे , सुधागड तालुका समन्वयक विक्रम काटकर , उरण तालुका प्रतिनिधी व्ही. एम्. बिंदू मॅडम , बांठिया हायस्कूलचे पर्यवेक्षक जे. के. कुंभार आदी मान्यवर तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात गणित संबोध परीक्षेतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे प्रत्येकी ५०० रुपये शिष्यवृत्ती , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . तसेच राष्ट्रीय स्तरावरील नीट २०२१ परीक्षेत ९९.१० टक्के गुण मिळवून एम.बी.बी.एस्. अभ्यासक्रमासाठी मुंबईतील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविल्याबद्दल नागोठणे येथील विद्यार्थीनी कु. संयुजा टिळक खाडे हिचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. गणित संबोध परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थी प्रविष्ठ केल्याबद्दल सु. ए. सो. माध्यमिक विद्यालय चिंध्रण , प. जो. म्हात्रे विद्यालय नावडे , सुषमा पाटील विद्यालय कामोठे , सु.ए.सो. माध्यमिक विद्यालय कळंबोली , ग.बा. वडेर हायस्कूल पाली या शाळांना उपक्रमशील शाळा म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील व देवयानी मोकल यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाच्या सर्व पदाधिका-यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog