पालकमंत्री आदिती तटकरे यांची द्रोणागिरी पर्वताला भेट
कामांबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा
खाबंवली,मालाठे ग्रामस्थांन समवेत संवाद!
तळा(कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत विकासासाठी राज्य सरकारने पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १.५० कोटी रुपये मंजूर केले असुन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांना गती मिळणार आहे.त्याअनुषगांने त्यांनी या भागातील ग्रामस्थांशी चर्चा करुन त्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला.आणि अधिकारी वर्गाशी या कामाबाबत चर्चा केली.
यावेळी ग्रामस्थांचे वतीने त्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ग्रामस्थांचे वतीने नरेंद्र लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे,जि.प.सदस्य बबन चाचले,
निकिता गायकवाड सरपंच शेनवली, गोविंद हिरवे ग्रा.पं.सदस्य, नागेश लोखंडे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका, जगदीश शिंदे विभागिय अध्यक्ष मंगेश भगत, तन्वीर पल्लवकर, युवा कार्यकर्ते देविदास रामाणे, मालाठे ग्रामस्थ, मालाठे धनगरवाडी, खांबवली धनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
तळा तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत विकास व पर्यटन संदर्भात अधिकारी वर्ग व ग्रामस्थांशी चर्चा करताना पालकमंत्री
Comments
Post a Comment