कोलाड परिसरात 35 वर्षीय महिलेचा खून

सहा तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

 सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची व त्याच्या पथकाची दैदीप्यमान कामगिरी!

कोलाड पोलिसांचे होते जिल्ह्यात अभिनंदन 

 रायगड (भिवा पवार )रोहा तालुक्यातील कोलाड पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मढाली(पुगाव ) आदिवासी वाडीतील ता. रोहा एका 35 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने मांडीवर पोटावर, गळ्यावर, जखमा करून त्या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

  या घटनेची तत्काळ दखल घेऊन कोलाड पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार उपनिरीक्षक ए,एल् घायवट कोलाड पोलिसांनी तीन पथके तयार करून आरोपीस सहा तासाच्या आत पकडून आरोपींच्या मुसक्या आवळल्याने कोलाड पोलिसांचे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की कोलाड पासून पाच किलोमीटरवर असणाऱ्या मढाळी पुगाव आदिवासी वाडीतील मयत रेवती नितीन पवार वय 35 वर्षे या महिलेची दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 6 वाजण्याच्या सुमारास प्रेत मिळाले होते सदर ही महिला मढाळी( पु गाव) आदिवासी वाडी येथे राहत होती वरील14 फेब्रुवारी रोजी शौचास जाते असे सांगून घरात आईला सांगून गेली ती घरी आलीच नाही इतरत्र शोध घेतला असता सदर महिलेचे प्रेत मढाली गावच्या हद्दीत आढळेल सदर महिलेची धारदार हत्याराने मांडीवर पोटावर व छातीवर तीक्ष्ण हत्याराने गंभीर दुखापत करून जीवे ठार केले होते

 सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकारी रोहा विभाग श्री सूर्यवंशी, पाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी काईंगडे यांनी तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट घेऊन सदर घटना स्थळाची पाहणी केली.

 सदर घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणा जोमाने कामाला लागली. पोलीस यंत्रणेची तीन पथके तयार करुन सदर महिला बाबत माहिती गोळा केली सदर मयत महिला पाच ते सहा वर्षे विभक्त राहत होती नवरा सहा महिन्यापासून कोळशाच्या कामाला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने तपास यंत्रणा फिरवून कोलाड पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन पथके तयार करुन तपास यंत्रणा जलद गतीने करून सुरू केली असता तर अवघ्या सहा तासातच सदर आरोपी दिनेश भिवा जाधव वय 38वर्षे रा. पुई आदिवासीवाडी ता. रोहा या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात कोलाड पोलिसांना यश आले असून कोलाड पोलिसांच्या या कार्यपद्धतीचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.

 याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात गु. र.009/2022भा. द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उलट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.एल, घायवट व कोलाड पोलीस पथक करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog