श्री स्वामी समर्थ मंदिर कुडली येथे 20 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरु प्रतिपदा उत्सव आणि सहस्र दीपोत्सवाचे आयोजन
सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक )श्रीक्षेत्र श्री. स्वामी समर्थ सेवा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री. स्वामी समर्थ मंदिर कुडली (ता. रोहा ) येथे दि. 16 फेब्रुवारी 2022 ते 17 फेब्रुवारी 2022 असे दोन दिवस 20 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुप्रतिपदा उत्सव आणि सहस्र दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. स्वामी समर्थ सेवा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट कुडली (ता. रोहा ) चे अध्यक्ष सोनूबुवा उर्फ विष्णु पडवळ यांनी सांगितले.
या वेळी श्रींस अभ्यंगस्नान, पादुका अभिषेक पूजा, आरती, श्री स्वामी स्तवन स्तोत्रे, अष्टक गायन् श्री स्वामी चरित्र सारामृत या सिद्ध ग्रंथाचे पारायण नेतृत्व सौ. सायली पडवळ, शुभारंभदीप प्रज्वलन श्री. नथुराम नेमाणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद, सामुदायिक भजन, नामजप श्री. राजेंद्र पडवळ आणि श्रीमती सुनंदा पोळेकर यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक रहिवाशी यांच्या तर्फे हरिपाठ, सहस्र दीपोत्सव सोहळा श्री. महेंद्र रामशेट वाचकवडे आणि श्री. श्याम वामन सरफळे, आणि बबन नथूराम सरफळे यांच्या हस्ते, महाप्रसाद श्री. स्वामी समर्थांचा ध्यास अभंगवाणी गायक डॉ. श्री. विक्रम परळीकर, सौ. वैशाली पाटील, पखवाज श्री. गणेश पाटील, तबला कु. हर्ष पाटील, स्थानिक सामुहिक शास्त्रीय भजन व याग (हवन) पुजा मांडणी, यज्ञ श्री. पुरोहित श्री. वसंत देवदत्त केळकर गुरुजी आणि सहकारी ब्रम्हवृंद मुंबई, श्री. ज्ञानोबा सरफळे, सौ. सुलोचना सरफळे यांच्या हस्ते स्थापित मूर्तीचा अभिषेक व पाहुण्यांचा सत्कार, पालखी सोहळा, ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे किर्तन त्यानंतर सर्व स्वामी भक्तांचे सामुदायिक भजन, आदि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सेवा व्यवस्था संपूर्ण कुडली ग्रामस्थ मंडळ, सरफळेवाडी ग्रामस्थ मंडळ, स्वामी समर्थ सेवेकरी, निजामपुर विभाग, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ तिकोणापेठ, श्री. स्वामी सेवेकरी मंडळ रोहा आदि सेवा व्यवस्था करणार आहेत. अध्यक्ष सोनाबुवा पडवळ, उपाध्यक्ष अॅड. बापूसाहेब पडवळ, सचिव विजय कामथेकर उपसचिव रामदास सरफळे, खजिनदार बळीराम महाडिक, उपखजिनदार विजय वांजले, कार्याध्यक्ष तुषार मोरे, मंदिर व्यवस्थापक तात्याराम कटे तसेच सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment