सुतारवाडी येथे संजय मित्र मंडळातर्फे शिवजयंती साजरी
सुतारवाडी:- (हरिश्चंद्र महाडिक )सुतारवाडी नाक्यावर गेल्या 22 वर्षापासून संजय मुंबरे मित्र मंडळातर्फे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी केली जाते. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित श्रीं ची पुजा, भजन आदि कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले.
संजय मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मुंबरे, उपाध्यक्ष राजूबुवा दळवी, सचिव प्रशांत तटकरे, खजिनदार वसंत मुंबरे तसेच सदाशिव कोदे आदिंनी शिवजयंती पार पाडण्यासाठी खूपच मेहनत घेतली.
Comments
Post a Comment