रोहा वांगणी ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शेकाप युतीचे एकनाथ ठाकुर भरघोस मतांनी विजयी

वाकण-नागोठणे (वर्षा जांबेकर ) रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या वांगणी ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप ,आघाडीचे एकनाथ गोपाळ ठाकूर हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत .

वांगणी ग्राम पंचायतीतील प्रभाग क्रमांक ३ चे सेना मनसे युतीचे ओबीसी म्हणून निवडून आलेल्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना हिराचंद दळवी यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समिती कडून अपात्र ठरल्याने प्रशासकिय नियमानुसार त्यांचे सद्स्य पद रद्द करण्यात आले त्या जागेवर १८ जानेवारी २०२२ रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली या करिता सेना मनसे युतीच्या माजी सदस्या सौ कल्पना दळवी यांचे पती हिराचंद येसूराम दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरत उमेदवारी लढवली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत निवडणूक लढवली याचा निकाल १९जानेवारी रोजी हाती आला असून यात सेना मनसे चे उमेदवार हिराचंद दळवी यांचा तब्बल पन्नास मतांनी पराभव करत राष्ट्रवादी, शेकाप आघाडीचे पुरस्कृत उमेदवार एकनाथ ठाकूर हे विजयी झाले आहेत.

ग्रुप ग्राम पंचायत वांगणी येथे संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक ३मध्ये एकूण मतदार संख्या ७११ या पैकी ६१८ मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावले यात राष्ट्रवादी ,शेकाप, युतीचे विजयी युवा उमेदवार एकनाथ गोपाळ ठाकूर यांना ३३२ मते मिळाली तर त्यांचे पतिस्पर्धी विरोधक उमेदवार हिराचंद येसुराम दळवी यांना २८२ मते मिळाली तर नोटा ४ मते असे एकूण ६१८ मतदान झाले असून यात एकनाथ ठाकूर यांनी तब्बल ५० मतांची आघाडी घेत हिराचंद यांचा दणदणीत पराभव केला आहे .

राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा रायगड रत्नागिरी चे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे शेकाप आमदार जयंताभाई पाटील यांच्या विकास कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मतदार बंधूनी हा विजयाचा कौल दिला आहे .तसेच आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर हे विजयी झाल्याने नागोठणे राष्ट्रवादी विभागीय नेते भाई टके,नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे,रमेश भिसे,एकनाथ जांबेकर,यशवंत हलदे,प्रमोद जांबेकर,शेखर ठाकूर,राजेश पिंपळे,किशोर कदम सह प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच सर्व मतदार बंधू आणि बघिणींचे व ग्रामस्थ नागरिकांचे नवनिर्वाचित विजयी उमेदवार एकनाथ ठाकूर यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे.



Comments

Popular posts from this blog