राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची निवेदनातून मागणी
रोहा तहसीलदारांसह संबधित पोलीस ठाण्यात दिले निवेदन!
कोलाड (श्याम लोखंडे ) प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहा तहसील कार्यालयात तसेच कोलाड पोलीस ठाणे,कै. द.ग.तटकरे ज्युनिअर कॉलेज कोलाड, तसेच माध्यमिक व प्राथमिक शाळेत निवेदन देत केली आहे.
रोहा तहसील कार्यालय नायब तहसीलदार राजेश थोरे ,रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पाटील व कोलाड पोलीस ठाण्याचे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव,यांना तसेच महाविद्याल शाळा कॉलेजात राष्ट्रीय ध्वजाचे अवमान व गैर प्रकार घडू नये या करिता हे निवेदन रोहा कोलाड येथील हिंदु जनजागृती समितीचे साधक प्रकाश मोरे, दिनेश खराडे,धर्माभिमानी संजय चोरगे, शांताराम देशमुख,रोहा तालुका शिवसेना उपतालुकप्रमुख चंद्रकांत लोखंडे ,जेष्ठ शिवसैनिक प्रवीण (आबा )शिंदे,कोलाड शिवसेना प्रमुख गणेश शिंदे,हिंदुवादी संतोष शिंदे,धर्माभिमानी जयेश जैतवाल,आदींनी या बाबतचे निवेदन दिले.तर यांच्यासह अन्य नागरिक व राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते. याच पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याविषयी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाने आदेश "दिले होते.या पार्श्वभूमीवर कोलाड हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्र ध्वजाचे होणारे अवमान रोखण्यासाठी निवेदनातून मागणी केली आहे.
Comments
Post a Comment