मराठी भाषा संवर्धनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांचा पुढाकार,
वडघर हायस्कूलमध्ये पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न
गोरेगाव पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम!
रायगड (भिवा पवार)सध्याच्या युगात वाढलेली इंग्रजीचे स्तोम पाहता मराठी विषयाचे महत्त्व कमी होत आहे ही बाब लक्षात घेता शासनाने मराठी भाषेचा गोडवा तुला वाढावा याकरिता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले होते या उपक्रमाला अनुसरून शाळेतील विद्यार्थी अध्यापन करणारे शिक्षक पालक यांना मराठी भाषेचे महत्व कळावे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरिता गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले पोलीस हवालदार श्री गणेशजी नरेंद्र समेळ,महिला पोलीस हवालदार सायली संतोष सानप,पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण अण्णा पाटील, पोलीस पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदा मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या दातृत्वातुन वडघर मुद्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मराठी कथा, थोरांचे चरित्र, समाजसेवक चरित्रात्मक, विविध प्रकल्प युक्त, पुस्तकांचे वाटप करण्यात आले त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्व जतन संवर्धन करण्याचे उपाय सांगितले आजच्या स्पर्धेच्या युगात आपण इंग्रजीचे स्तोम कमी होणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी पोपटपंची शिक्षण घेतात ते चिरकाल टिकत नाही मात्र मराठी माध्यमातून घेतलेले शिक्षण चिरकाल टिकणारे असते संस्कारांची सांगड घालून जीवनाला प्रगतीपथावर घेऊन संस्कारक्षम आदर्श व्यक्ती म्हणून जगण्याची ऊर्जा देते. तसेच क्रमिक पाठ्यपुस्तकातील संबोध, संकल्पना, ह्या मराठी विषयातून जास्त चांगल्या प्रकारे समजतात त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे शिक्षण व संस्कार या दोन्ही गोष्टी मराठी भाषेतून चांगले होते.
मराठीच्या संवर्धनासाठी मी कटिबद्ध असून शाळेसाठी महत्त्वाचे योगदान देईन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली धारसे मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी विविध आयोजित विविध उपक्रम आयोजित करून याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे प्राचीन काळातील ग्रंथरचना मराठीत आहे त्यांचे अस्तित्व मात्र टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करूया यावेळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चा एक उपक्रम म्हणून मराठी भाषेविषयी ज्यांना गोडी आहे त्यांची मुलाखत घेत द्यावी.
या उद्देशाने गोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांची सांस्कृतिक प्रमुख राजन पाटील सर यांनी विविध प्रश्न विचारून मुलाखत घेतली जीवन चरित्रावरील विविध प्रश्नांचे श्रीकृष्ण नावले साहेबांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेहनत करताना कसूर करू नका आयुष्यात तुम्हाला जर चांगले अधिकारी व्हायचे असतील तर आतापासूनच नियोजन करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या शिर्के मॅडम प्रास्ताविक श्री राजन पाटील सर आभार प्रदर्शन भिवा पवार सर यांनी मानले.
स्तुत्य उपक्रम...👌👌
ReplyDelete