महागांव येथे बांगडी भरण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम उत्सहात संपन्न
इंदापूर (प्रतिनिधी) अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती युवक मंडळाचे महागांव (तळा)तालुका अध्यक्ष श्री.किरणजी साळवी यांच्या संकल्पनेतून व काळाची गरज म्हणून पारंपारिक व्यवसायाकडे पुन्हा वळण्यासाठी बांगडी भरण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम महागांव येथील श्री.कालिका माता व विठ्ठल रखुमाई गणेश मंदिरात दि.20 जानेवारी रोजी संपन्न झाले.
रायगड जिल्हा युवा अध्यक्ष गणेशजी साळवी व महिला अध्यक्षा रिया कासार यांच्या संयोजनातून *"बांगडी भरण्याचे प्रशिक्षण शिबीर"* व महागांव महिला मंडळ यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमात कोकण विभाग समाजोन्नती मंडळाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री.दगडूशेठ साळवी, उपाध्यक्ष श्री.नारायणजी वारे, मध्यवर्तीचे विभागिय अध्यक्ष व कोकण विभाग समाजोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.विलास कासार गुरूजी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला...यांस बरोबर आसरे-कासारवाडीचे गावकी अध्यक्ष श्री.कृष्णाजी मांगले,श्री.पुरुषोत्तमजी अडसूळे,श्री.अरुणजी साळवी,श्री.गोपीनाथजी पोरे तसेच विलास कासार गुरूजी यांच्या सौ. व चरई हून सौ.वृक्षाली कासार यांचा देखील यथोचीत सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास श्री.कमळाकरजी मांगले व श्री. डॉ.प्रकाशजी वारे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले तसेच श्री.अरूणजी मांगले, श्री.प्रभाकरजी मांगले,श्री.गंगारामजी साळवी,श्री .सदानंदजी मांगले ,श्री.जयेंद्रजी साळवी,श्री.मधुकरबुवा श्री.चंद्रकांतजी साळवी यांचे तसेच महागांव महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले..मान्यवरांनी आपल्या मनोगतात आपला पारंपारीक व्यवसाय वाढवण्यासाठी असेच स्तुत्य उपक्रम राबवावेत असे सुचीत करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सौ.शशीकला मांगले,सौ.शालिनी वारे, सौ.सुनंदा मोहीरे,सौ.मनीषा साळवी, सौ.लिना साळवी ,सरिता साळवी ,सौ.पोरे काकी यांनी नवोदीत शिकाऊ महिलांना उत्तम प्रशिक्षण दीले त्यांचे तालुका अध्यक्ष किरणजी साळवी यांनी विशेष आभार व्यक्त केले..
Comments
Post a Comment