आज गांधीविचारांची गरज आहे?

आज गांधीजींच्या विचारांची गरज आहे का ? या विषयावर माझे मत मांडत असताना मी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाला, या महात्म्याला शतश: प्रणाम करते.

     सत्याचा पुजारी तू 

       अहिंसेचा भोक्ता

      माणसातल्या देवा तू 

           दुबळ्यांचा दाता

           तुझ्या चरणी मी 

              ठविते माथा ।

मित्रही, खरे तर गांधी तत्वज्ञान म्हटले की, आपल्यासमोर उभी रहातात ती समाजातली नभळट, घाबरट नामर्द, भित्री आणि अन्याय सहन करणारी माणसं आणि म्हणून आपण गांधीविचारांची, गांधीनत्वज्ञानाची टिंगल करत असतो कारण आपल्याला कधी गांधी समजलेच नाहीत. आपल्याला फक्त समोरच्याने एका गालात चापट मारली की दुसरा गाल पुढे करणे म्हणजे गांधी आणि एका भागात धक्का दिला की बुक्का मारण म्हणजे टिळक एवढ्यातच गांधी आणि टिळकांना आपण गुंडाळलं.

आज गांधीविचारांची गरज आहे का? याविषयी सांगण्यापूर्वी मी प्रथम गांधीजींचे तत्वज्ञान सांगू इच्छिते. गांधीविचारांचं पहिलं तत्व होतं 'सत्य' ज्याचा प्रत्येक महात्म्याने संतांनी पुरस्कार केला आहे. सत्य हे एक शाश्वत आहे 'सत्य' हाच खरा धर्म आहे. 'सत्यमेव जयते' हे आपले ब्रिद आहे या तत्वाची, या विचारांची केवळ वर्तमानालाच नाही तर भविष्यातही नितांत गरज आहे. कारण सध्या नितीमूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे आणि सत्यमेव जयते हे केवळ सुविचारापुरते मर्यादीत राहून सर्व क्षेत्रात भ्रष्ट विचारानं थैमानं घातलं आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराला भूठमाती घालण्यासाठी आजच्या पिढीला सत्याच्या मार्गावर आणण्यासाठी गांधी विचारांची नक्कीच गरज आहे यात वादच नाही,

 गांधीजींनी सत्याबरोबरच अहिंसेचा नेहमीच पुरस्कार केला. आपल्या अनुयायांना अन्यायांशी व जुलमांशीअ हिंसात्मक प्रतिकार करायला शिकवले पण ही अहिंसा भ्याड भाणसांची नव्हती. अहिंसेविषयी गांधीजी म्हणतात, "अहिंसा हा भ्याडाचा किंवा नेभळटणाचा मार्ग नव्हे. मृत्यूला सामोरे जाणाऱ्या शूरांचा तो मार्ग आहे. हाती शस्त्रे घेऊन जो मृत्युमुखी पडतो तो निःसंशय शूर आहे. परंतू जरादेखील कच न खाता किंवा बोटे देखील न उचलता जो मृत्यूला सामोरा जातो, तो अधिक शूर म्हटला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने भारताचा तर नाहीच, पण जगाचा देखील उद्धार होणे कठीण आहे म्हणूनच विशुद्ध अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा कुणी साथीदार मिळाला नाही तरी मी एकटाच अहिंसेचे कार्य करण्यात संतोष मानिन या गांधीजी च्या विचारांमध्ये किती गहनता आहे ! छोट्या छोटया कारणांवरून एकमेकांच्या जिवावर उठण, जाळपोळ, मारामारी, असिड हल्ल्ला अशा कितीतरी क्लेशदायक, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आज आपण पहात असतो .आजच्या तरुण पिढीमध्ये तर अशा विकृतींचा उत आला आहे हे कुठेतरी थांबवायचं असेल तर गांधी विचारांचा अंगिकार करण्याची गरज आहे.आपण गांधीविचारांचा तिरस्कार करतो त्याचे कारण म्हणजे, मूळात आपणास गांधी समजले ना त्यांचे विचार समले पण त्यांच्या विचारांनीच देशाला रणाविना, रक्ताविन। हिंसेविना स्वातंत्र्य मिळवून दिले. हे विसरून चालणार नाही . गांधीविचार म्हणजे अन्याय सहन करणे हा नसून,गांधी विचार म्हणजे अन्याया विरुद्ध न्याय्य मार्गाने लढा देणे हा होता, अत्याचाराचा प्रतिकार अत्याचाराने करणे गांधीजींना कधिच मान्य नव्हते, आगीने आग विझत नसूज ती दुप्पट वेगाने पेटते व त्यात निष्पाप जिवांनाही उध्वस्त व्हावं लागतं त्यानं कुणाचच भलं होल नाही आज तशीच परिस्थीती निर्माण झाली आहे. प्रत्येक समूह आपल्या मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने काढून आक्रमक पवित्रा घेतात दगडफेक, लाठीमार यात कित्येकांचे नाहक बळी जातात. अशाने कोणच सूखी होत नाही म्हणूनच आज अन्यायाविरुद्ध शांततेच्या, अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने लढण्याची गांधी विचारांच्या रस्त्यावरून जाण्याची गरज आहे. तरच समाजातील अराजकता नष्ट होऊन सर्वांन। स्वातंत्र्याची फळे समाधानानं आनंदानं चाखता येतील. म्हणूनच मी आजच्या तरुणाईला सांगू इच्छिते की, गांधीविचार हे देशातच नाही तर विश्वाला शांती निर्माण करणारे आहेत. म्हणूनच "गांधी विचारांचा स्वीकारा मार्ग,नक्कीच होईल भारताचा स्वर्ग 'शेवटी ईश्वर चरणी एकच प्रार्थना करते की. " हीच आमची प्रार्थणा अन् हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

Comments

Popular posts from this blog