रोहा येथे मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्य मैफल उत्साहात साजरी
रोहा (राजेश हजारे)सध्याच्या युगात वाढलेले इंग्रजीचे स्तोम पाहता मराठी विषयाचे महत्व कमी होत आहे ही बाब लक्षात घेता शासनाने मराठी भाषेचा गोडवा पुन्हा वाढावा. या करीता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अशा दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून साहित्य मित्र रोहा, नक्षत्रांचे देणे रोहा, आणि मराठी भाषा संवर्धन कट्टा, यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच साहित्य मैफल प्रधान क्लासेस रोहा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास श्री शेरमकर सर, श्री मकरंद बारटक्के, सौ आरती धारप, सौ सायली जोगळेकर, सौ अचला धारप, श्री सुधीर क्षीरसागर डॉक्टर रोहन भेंडे, श्री नितीन प्रधान, श्री हनुमंत शिंदे, श्री रणजीत सर, हे रोह्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उपस्थित साहित्यिकांनी आपल्या सुंदर साहित्य रचना सादर केल्या. तसेच श्री मकरंद बारटक्के यांनी मराठी भाषा संवर्धनाचे महत्व विशद केले. डॉक्टर रोहन भेंडे यांनी मराठी भाषा संवर्धनातील समस्यांचा उहापोह केला. . साहित्य मित्र संघटनेचे सदस्य माननीय श्री मकरंद बारटक्के यांची मराठी भाषा संवर्धन मंडळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. एकंदरीत सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
Comments
Post a Comment