कोलाड रोहा लायन्स क्लबच्या वतीने कोलाड गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी
खांब (नंदकुमार कळमकर )लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग,समता फाऊंडेशन मुबंई,गोदरेज फाऊंडेशन, लायन हेल्थ फाऊंडेशन व झोन चेअरपर्सन ,यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्सक्लब चे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून तसेच लायन डॉ विनोद गांधी व डॉ मंगेश सानप,डॉ सपना गांधी यांच्या सहकार्यातून 13 जानेवारी रोजी गांधी नर्सिंग होम कोलाड आंबेवाडी येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र व मोती बिंदू तपासणी करण्यात आली. यावेळी तीसहुन अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
प्रसंगी यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून यामध्ये अकरा रुग्णांवर मोफत मोती बिंदू ,व पाच रुग्णांवर स्पेशल शस्त्रक्रिया करण्यात आली तर उर्वरीत रुग्णांना अल्प दरात श्रुती ऑप्टिकल कोलाड च्या वतीने अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले .
यावेळी लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबागच्या डॉ वर्षा मॅडम,डॉ सुजीत पाटील, केळकर, क्लबचे सेक्रेटरी ला.रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्याम लोखंडे,उपाध्यक्ष डॉ मंगेश सानप,बोर्ड ऑफ डायरेक्टर तथा गांधी नर्सिंग होमचे व्यवस्थापक डॉ विनोद गांधी,गांधी पॅथॉलॉजीकल डॉ सपना गांधी,ला.सौ पूजा लोखंडे श्रुती ऑप्टिकलचे विठ्ठल सावळे,संभे ग्राम पंचयातीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय सानप,मंगेश सानप ,सौ सुषम पंडित इत्यादी प्रमुख मान्यवर व आदी रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते ,
प्रसंगी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीकरिता कोलाड रोहा लायन्सक्लबचे पदाधिकारी व डॉ गांधी नर्सिंग होम च्या सर्व नर्स स्टाफ ने अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment