वाळंजवाडी येथील जैयवंती वाळंज यांचा आकस्मित निधन,
कै.जैयवंती गोपीनाथ वाळंज |
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील वाळंजवाडी येथील रहिवासी जैयवंती गोपीनाथ वाळंज यांचा गुरुवार दि.२/१२/२०२१ रोजी हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५६ वर्षांचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होत्या.आधुनिक काळात बहुतेक ठिकाणी एकत्र कुटुंब दिसून येत नसले तरी अद्यापही त्यांचे एकत्रित कुटूंबात राहत होत्या.त्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर व समस्त वाळंजवाडी ग्रामस्त उपस्थित होते त्यांच्या पश्चात त्यांचे पती,मुलगा,सून,जाऊबाई,पुतणे,पाच पुतण्या,नातवंडे व मोठा वाळंज परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.११/१२/२०२१ रोजी पहूर येथील तलावावर तसेच त्यांचे उत्तर कार्य विधी सोमवार दि.१३/१२/२०२१ रोजी त्यांच्या वाळंजवाडी येथील त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment