स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची वार्षिक सहल उत्सहात संपन्न

. गोवे-कोलाड (विश्वास निकम)स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी कोलाड यांची वार्षिक सहल मंगळवार दि.२१ /१२/२०२१ रोजी मोठया उत्साही वातावरणात संपन्न झाली.

. स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात येते परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र बंदी घालण्यात आली होती यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु या वर्षी सर्वत्र बंदी उठविल्यानंतर या वर्षी कोलाड जेष्ठ नागरिक मंडळाच्या वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले.

. यावेळी कोलाड जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुगावली येथील स्वयंभु गणपती मंदिर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन 

येथील सोमजाई मंदिर,व दिवेआगर येथील सोन्याचा गणपती येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाच्या १०० सदस्यांनी सहभाग घेतला.कार्यकारी मंडळ व सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने ही वार्षिक सहल उत्साही वातावरणात संपन्न झाली.

.

Comments

Popular posts from this blog