कोलाड विभाग कुणबी समाज ग्रुप अध्यक्षपदी संदेश लोखंडे,
खांब (नंदकुमार कळमकर ) कुणबी समजोन्नती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा विभाग कोलाड ग्रुप अध्यक्षपदी नुकतीच संदेश लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
रायगड जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस शिवराम महाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या अध्यक्षतेखाली कोलाड आंबेवाडी येथे आयोजित केलेल्या विभागीय कुणबी समाजाच्या सभेत कोलाड विभाग कुणबी समाज ग्रुप अध्यक्षपदी सर्वानुमते संदेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रसंगी यावेळी उपस्थित मुबंई संघाचे सदस्य डॉ सागर ,डॉ मंगेश सानप,कोलाड विभागातील कुणबी समाजनेते चंद्रकांत लोखंडे ,मारुती मालुसरे,मनोहर महाबळे,केशव महाबळे,दामाजी कदम,दत्ताराम निवाते,विठोबा गोरीवले,बळीराम ठोंबरे,चंद्रकांत ठाकूर,कुणबी युवक संजय सानप,महेश ठाकूर,विजय लोखंडे,अजय लोखंडे,संदीप मालुसरे,आदी विभागातील ग्रुपचे कुणबी नेतेगण उपस्थित होते ,
सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संदेश लोखंडे यांची कोलाड विभागीय कुणबी समाज ग्रुप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी विभागातून व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment