पुई गावाचे विठोबा महाडीक यांचे दुःखद निधन
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील पुई गावातील प्रगत शेतकरी विठोबा महादू महाडीक यांचे गुरुवार दि.२३ डिसेंबर २०२१रोजी वृद्धपाकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षाचे होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.व सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.
. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधी साठी रायगड जिल्ह्यातील भोई समाज बांधव, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,व समस्त पुई ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात एक नातू, नात सून, एक मुलगी,पतवंडे, व मोठा महाडिक परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१ जानेवारी तर उत्तकार्य विधी मंगळवार दि.४ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या पुई येथील निवास्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांकडून प्राप्त झाली आहे.
Comments
Post a Comment