ग. द. तटकरे विद्यालय कोलाड येथे स्व. दत्ताजीराव तटकरे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी,
गोवे-कोलाड (विश्वास निकम सुधागड एज्युकेशन सोसायटीचे द. ग.तटकरे विद्यालय कोलाड येथे स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी दत्ताजीराव तटकरे यांच्या काळातील जेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम द. ग. तटकरे विद्यालय येथे संपन्न झाला यावेळी काकासाहेब माने, बाबुराव बामणे,उमाजी निवाते,मारुती खरिवले,नारायण धनवी, रामचंद्र चितलकर,प्रकाश थिटे, आदी जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते यांचा सत्कार रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या सुभेहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्या भाषनातून अणांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी येथील तरुणांनासाठी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण, एमपीएससी ,व युपीएससी केंद्र,येथील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली याची त्वरित मान्यता आदिती तटकरे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा गणेश घोणे यांनी केले.
Comments
Post a Comment