नगरपंचायत निवडणुकीत मतदारांच्या रांगा
लोकशाहीतील मतदारांचा अमूल्य मत,
मतदानाचा टक्का वाढून ७३.८२%मतदान!
तळा - कृष्णा भोसले तळा नगरपंचायतनिवडणुकीत
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या दिसत होत्या.
नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.तर ओबीसी आरक्षण मुळे चार जागांवर १८ जानेवारी.ला मतदान होणार असून आज १२ जागांवर ३५ उमेदवारांचे भवितव्य मतदानाव्दारे पेटीत सिलबंद होणार आहेत.या सगळ्यांचा निकाल १९ जाने.२०२२ ला लागणार आहे. तळा नगरपंचायत निवडणुकीत ४१४१ मतदार असुन पुरुष मतदार २०७९ तर महीला मतदार२०६२आहेत.या नगरपंचायत हद्दीत १२ मतदान केन्द्र असुनप्रशासनाने सर्व केन्दावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला जात आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ५९.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ६८.९२ टक्के
मतदान झाले.तर त्यानंतर ५.३० वाजेपर्यंत ७३.८२ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात याआधीच तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पीएसआय शिवराज खराडे,दंगल नियंत्रण पथक ,४१ पोलीसांचे पथक यांनी संचलन करुन , ४ पोलीस अधिकारी,४२पोलीस कर्मचारी ११ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त असुन कुठेही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी यंत्रणासज्ज आहे.प्रशासकिय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा पोलीस दलासोबत निवडणुक शांततेत पार पडत आहे.
या निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर, मास्क लावणे, सॅनिटायझर लावुन मतदान करून. घेण्यावर शासकीय कर्मचारी अधिकारी लक्ष देत आहेत. या सगळ्या उमेदवारांचे भवितव्य व निकाल जाहीर होणेसाठी १९ जानेवारी २०२२रोजी होईल.
Comments
Post a Comment