बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेची कार्यकारिणी जाहीर!
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पाशिलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन केला सन्मान!
गोफण- रोहा (रघुनाथ कडू) बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी पाशिलकर यांनी चंपाषष्ठीचे औचित्य साधून दिनांक ९ डिसेंबर रोजी रोहा येथील रायकर पार्कच्या हाॅफिस मध्ये ठिक दुपारी २:३५ वाजता संचालक मंडळाची सभा घेऊन प्रोसिडिंगवर ठराव घेऊन निवड केलेल्या कार्यकारणीची नियुक्ती करुन प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नियुक्ती करते वेळी अध्यक्षांनी उपस्थितांच्या समोर संघटणेच्या कार्याचे गांभीर्य समंधीतांना ऐकवले कोरोना काळात शेतकरी बंधू भगिनींना झालेल्या आर्थिक नुकसानीची व्यथा मांडत असतांना सहकार्यांवर कोविड१९ या महामारीने काळाच्या ओघात आपल्याला सोडून गेलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यकारिणीतील झालेली पोकळी ओळखून नवीन संचालक पदी नियुक्ती करणेच्या ठरावानुसार सुचक व अनुमोदक नुसार रिक्त पदासाठी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी संस्थेच्या दक्षिण विभाग उपजिल्हाअध्यक्ष पदी नागोठणे येथील सुकेळी गावातील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश कातकरी यांच्या नावाला सर्वांमते पसंती देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच महिलांच्या कार्याची दखल घेऊन महिला वर्ग हिरारीने संघटणेत सहभागी व्हावे व महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी धडाडीने काम करण्याची जिज्ञासा अंगी असणार्या अशा तळमळीच्या जिद्धी तरुण कार्यकर्त्या प्रियांका कांबळे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा महिला अध्यक्षापदी म्हणून सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.तर कार्याचा भार वाहक व सामाजिक अभ्यासू असे व्यक्तिची संघटणेस आवश्यकता असल्याने तश्या व्यक्ती व अनेक शासकीय यंत्रणेच्या संबंधीत असणारे जानकार म्हणून ओळख असणारे असे रघुनाथ कडू यांची संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यांत आली.तसेच रोहा तालुका अध्यक्ष पदी श्री राजेन्द्र शिंदे यांची निवड झाली होती पण त्यांचे नियुक्ती पत्र देण्याचं बाकी होते ते देखील या निमित्ताने देण्याचा योग आला.त्यांना देखील पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील सन्मानीय मान्यवरांची नियुक्ती करुन त्यांना लगेचच नियुक्ती पत्र देऊन पदभार देण्यात येऊन त्याना पुढील कार्याची माहिती दिली.
सन्मानित झालेल्या सर्वांनी आपल्या प्रति विश्वासदर्शक पदभार दिल्याची जाणीव ठेवत आपले मनोगत व्यक्त केले.व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आलेली जबाबदारी निस्वार्थी पणे पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे बोलुन सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे निर्णय घेण्यात येईल,असे आपले म्हणणे मांडून बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून धन्यवाद दिले.
यावेळी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष .शिवाजी मुटके ,जिल्हा खजिनदार दगडू बामुगडे , लाड ,तुकाराम सानप , राजेन्द्र जाधव , गजानन सकपाळ , नामदेव धोत्रे ,श्री मनोहर शिंदे , लक्ष्मण जाधव राजेन्द्र शिंदे ,.आल्टे ,यशवंत साळवी , तसेच बळीराजा संस्थेचे इतर संचालक यावेळी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव श्री राजेन्द्र जाधव यांनी सभा अतिशय खेळीमेळीच्या भावनेतून झाल्याचे कबूल करून सर्वांचे शब्दसुमनांनी आभार मानून सभा संपविल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment