आंबेवाडी नाका येथील गटार लाईनचे काम अर्धवट स्थितीत,गटाराच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण!

महामार्गाचे काम अर्धवट,नागरिकांच्या जिवाला धोका!

             गोवे -कोलाड (विश्वास निकम)आंबेवाडी नाका येथील गटारालाईंचे काम गेल्या वर्षी सुरु केले होते. ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण होईल असे वाटत होते. परंतु एक वर्षे पुर्ण होऊन गेले तरी या गटारलाईनचे अर्धवट स्थितीत असून येथील जागोजागी खोदून ठेवलेल्या गटारांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

         मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी व वरसगाव नाका या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला गेल्या वर्षी गटार लाईनचे काम सुरु होते.ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण होईल असे मुंबई-गोवा हायवे वरील काम करणाऱ्या ठेकेदारांनी सांगितले.पण हे काम पावसाळा संपला तरी अर्धवट स्थितीत आहे.काही ठिकाणी गटारलाईन पुर्ण झाले आहे. अशा ठिकाणी गटारावर बसवलेले झाकण एवढे निस्कृष्ठ दर्जाचे आहे.कि एका महिन्यात ते तुटून खाली गेले आहे.

                शिवनेरी मंगळकार्यालय जवळ असणाऱ्या पोस्ट ऑफिस जवळ तर एक मोठा खड्डा खोदून ठेवला आहे.यामुळे या बाजूला जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तर आंबेवाडी नाका येथील प्रभु एजेंशीच्या या खोदून ठेवलेल्या गटारात एक छोटा मुलगा पडून गंभीर जखमी झाला होता.तसेच अर्धवट कामामुळे काही ठिकाणी गटार मोकळा ठेवल्यामुळे या गटारात घाण,व असंख्य बाटल्या टाकल्या असून त्या कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसलेली आहे.यामुळे नागरिक हैराण झाले आहे.

 मुंबई-गोवा हायवे महामार्गाचे पनवेल ते इंदापूर दरम्यानचे काम गेली बारा वर्षां पासून सुरु असुन एक तप पुर्ण झाले तरीही या महामार्गाचे काम अर्धवट असून कोठे गटाराचे काम, मोऱ्यांचे काम,कोठे पुलाचे काम, अर्धवट स्थितीत आहे.तर वडखळ ते कोलाड दरम्यानच्या महामार्गाचे अतिशय बिकट आहे. एवढ्या वर्षात प्रत्येक वर्षी फक्त सात किलोमीटरचे काम केले असते तरी हे काम पुर्ण झाले असते.परंतु नियोजन मात्र शुन्य यामुळे या बिकट रस्त्यामुळे महामार्गवर किती जणांना आपले नाहक प्राण गमवावे लागेल हे सांगता येत नाही.

        इंदापूर ते पोलादपूर दरम्यान या महामार्गाचे कामाला सुरु होऊन तीन ते चार वर्षे झाली व या महामार्गाचे काम एवढे वेगात सुरु असून ६० टक्के काम पुर्ण झाले आहे.तर पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम बऱ्यापैकी झाले आहे मग वडखळ ते कोलाड या महामार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी कोठे माशी शिंकली    आहे.असे मत राष्ट्रीय छावा संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निलेशभाई महाडीक यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog