इंस्पायर अवॉर्ड मानक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रा.जि.प.दहिवली मराठी शाळेच्या प्रतिकृतीची निवड





       माणगाव(प्रतिनिधी )   सन २०२०-२१ इंस्पायर अवॉर्ड मानक राष्ट्रीय स्पर्धा अंतर्गत रायगड जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात आलेल्या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा दहिवली मराठी शाळेतील इयता ६ वी चा विद्यार्थी कु.अथर्व निलेश शिंदे याच्या 'वृक्षलागवडीचे अवजार' या प्रतिकृती ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.दहिवली मराठी शाळेचे उपशिक्षक श्री पंकज नरेश नागे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

            रायगड जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १० वी च्या सर्व माध्यमांच्या शाळा या गटामध्ये सहभागी झाल्या होत्या.अंतिम गटात ४५ प्रतिकृतींची निवड करण्यात आली होती. प्रतिकृतींचे परीक्षण झाल्यानंतर त्यातील कु.अथर्व निलेश शिंदे याच्या 'वृक्षलागवडीचे अवजार' या प्रतिकृती चे राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहे..राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिकृती निवडली गेल्यास राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

            या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची प्रतिकृती निवडली गेल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

            सदर प्रतिकृती तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा केळकर मॅडम,पदवीधर शिक्षक श्री संजय पाटील सर,ज्येष्ठ शिक्षक श्री गिरीधर कुथे सर,विषयशिक्षक श्री रोहन खडस सर व सौ नेहा जाधव मॅडम यांनी या प्रतिकृती स्पर्धेत कु अथर्व शिंदे याला उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

         सदर यशाबद्दल माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ.सौ.सुनिता चांदोरकर मॅडम,केंद्रप्रमुख श्री अजय पाटील सर,शाळा व्यवस्थापन समिती दहिवली चे माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत चेरफळे ,विद्यमान अध्यक्ष श्री जयेंद्र सत्वे,उपाध्यक्ष श्री निलेश शिंदे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ, पालक यांनी यशस्वी विद्यार्थी कु अथर्व शिंदे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिकृती यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog