येरळ प्राथमिक शाळेला सुनिल चौधरी यांच्या कडून विदयार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप,
सुतारवाडी (हरीश्चन्द्र महाडिक ) रिद्धी मेडिकल स्टोअर्स ( उरण ) चे श्री. सुनिल चौधरी आणि सौ. प्रिया चौधरी यांच्या तर्फे रायगड जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येरळ ला रु. सात हजार रकमेची कोरोना प्रतिबंध साहित्य शाळा व्यवस्थापन समिती येरळ चे अध्यक्ष श्री. रामदास शिंदे आणि शाळेचे मुख्याध्यापक खेमसिंग चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक तसेच विदयार्थी उपस्थित होते.
या पुर्वी ही श्री. सुनिल चौधरी तसेच सौ. प्रिया चौधरी या दाम्पत्यांकडून शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच शैक्षणिक साहित्य दिले होते त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment