ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे संजय (आप्पा) ढवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मंजुळा नारायण लोखंडे वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे माणगाव तालुका भाजपाध्यक्ष संजय (आप्पा)द्वारकानाथ ढवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे शुभारंभ 28 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साह वातावरण करण्यात आले .

प्रसंगी यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे,स्थानिक कमिटी चेअरमन गोविंद वाटावे,हभप नारायण महाराज लोखंडे,विशाल गालांडे युवा माणगाव भाजपाध्यक्ष, बाबुराव चव्हाण इंदापूर विभाग भाजपाध्यक्ष,संजय जाधव निजामपूर विभाग भाजपाध्यक्ष, आत्माराम डवले माणगाव भाजप बुथ अध्यक्ष,तसेच वन विभागाचे भावसाहेब धनावडे,रघुनाथ कोस्तेकर सरपंच तळवली तर्फे अष्टमी ,सेवा निवृत्त शिक्षक अरुण खांबकर, कल्पेश माने ,पालक संतोष महाडिक, संदीप महाडिक,सौ सुचिता गोळे,श्रीमती अनुपमा चितळकर, सौ मानसी चितळकर,शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे , सहा शिक्षिका सोनाली शिंदे,ऋतुजा पवार,प्रतीक्षा धामणसे, शिक्षक विनायक माहीत ,कर्मचारी संतोषीनी वाळंज ,आदी मान्यवर व पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .

शाळेचे शैक्षणिक कार्य खूप मोठे विद्यार्थी वर्गासाठी नव्या वर्ग खोलीचे माणगाव तालुका भाजपाध्यक्ष संजय आप्पा ढवळें कडून आश्वासन:-मोठया उत्साही आणि आनंदायी वातावरणात शाळेतील क्रीडा स्पर्धेचे शुभारंभ करतांना आप्पा ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ग्रामीण भागातील तसेच तळागाळातील मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचे महान कार्य या ठिकाणी होत आहे गरिबातील गरीब शेतकऱ्यांच्या व विविध घटकातील सर्व सामान्यांच्या मुलांना योग्य व माफक दरात इंग्रजी शिक्षण देण्याचे काम लोखंडे दाम्पत्याकडून होत असल्याचा आनंद व्यक्त करत इंग्रजी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी वर्गाची बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे कबड्डी, डॉज बॉल, रनींग, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी, भाला फेक, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बेडूक उडी, बुक बॅलन्स, पोटॅटो रेस असे विविध प्रकारचे खेळांच्या अर्गत स्पर्धा घेऊन त्यांची खेळातील क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना भारतीय संस्क्रुती नुसार सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे उत्तम कार्य सुरू असल्याने याठिकाणी शैक्षणीक क्षेत्र म्हणून काही जाहीर न करता योग्य वेळेत योग्य काम या वास्तूत येत्या आठ ते दहा दिवसात माझ्या हातून घडलेले दिसेल असे उत्तम आणि मोलाचे मार्गदर्शन करत यावेळी विद्यार्थी वर्गासाठी एका नव्या वर्ग खोली बांधण्याचे आश्वासन दिले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शिंदे मॅडम यांनी केले प्रास्तविक रविंद्र लोखंडे यांनी केले व आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .



Comments

Popular posts from this blog