महाड मधून महिला बेपत्ता आढळल्यास संपर्क साधावा महाड पोलिसांचे आवाहन!
महाड( विशेष प्रतिनिधी )महाड तालुक्यातील 26 वर्षीय महिला बेपत्ता झाली असल्याची घटना घडली असून सदर महिला आढळल्यास याबाबत महाड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहेयाबाबत महाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी की महाड तालुक्यातील राहणार मौजे पांगारी मूळगाव तालुका महाड येथून महिला अपेक्षा प्रतीक मोरे वय 26वर्षे, ही महिला दिनांक 8 डिसेंबर रोजी 10: 15 वाजता महाड डॉक्टर कडे जाते असे सांगून गेली ती अद्याप घरी परतली नाही सदर महिला अंगाने मजबूत असून उंची 155 सेमी, रंग निमगोरा, केस काळे,अंगात आकाशी रंगाची साडी व आकाशी रंगाचा ब्लाउज तसेच पायात उंच टाचेची काळे रंगाची चप्पल, असे वर्णन असून महाड पोलीस ठाण्यात याबाबत मनुष्य मिसिंग रजि. नं.13/ 2021 नुसार नोंद करण्यात आली असून सदर वर्णनाची महिला आढळल्यास महाड तालुका पोलीस ठाणे पोना. टी.डी. लोळे मो. 8554086125 फोन.02145/222254 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन महाड तालुका पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment