कोलाड़,खांब,पुगांव,नडवली,चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे पिंपळवाडीत उद्या दत्त जयंती उत्सव सोहळा,

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील कोलाड़ खांब पुगांव,नडवली चिल्हे,देवकान्हे (पिंपळवाडी) या विभागात ठीक ठिकाणी सालाहबाद प्रमाणे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने शनिवारी ता 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने दत्त जयंती जन्मोंउत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे,

      सदरच्या कार्यक्रमात श्री गुरुदेव दत्तात्रेय जन्मउत्सव श्री दत्त पूजा पाद्य पूजन महाभिषक तद् नंतर श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध ठीक ठिकाणी सांयकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार असून देवकान्हे पिंपलवाड़ी येथ रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी संप्रदाय हरिपाठ तसेच 8 ते 9 या वेळेत महाप्रसाद तद्नंतर ह भ प दिनेश महाराज कडव (वांदोली) रोहा यांचे सुश्राव्य कीर्तन रुपी सेवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे रात्रौ देवकान्हे,पिंपलवाड़ी ग्रामस्थ व महिला मंडळ यांचा भजन जागर होणार आहे तसेच कोलाड़ खांब पुगांव नडवली चिल्हे धानकान्हे या ठिकाणी देखील मोठ्या उत्साह वातावरणात भजन कीर्तन जागर होणार आहे व विविध विधिवत पूजा तसेच धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

सदर या कार्यक्रमाची व श्री दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी ग्रामस्त मंडळ देवकान्हे पिंपळवाडी महिला मंडळ व युवक युवती अतिशय परिश्रम घेत आहेत तरी सर्व भाविक भक्त गणांनी याचा लाभ घेवा असे देवकान्हे ग्रामस्त पिंपळवाडी यांच्या वतीने कळविण्यात येत आहे,

Comments

Popular posts from this blog