लायन्सक्लब आयोजित चिल्हे येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
115 रुग्णांची तपासणी, 30 रुग्णावर होणार शस्त्रक्रिया,
खांब (नंदकुमार कळमकर ) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग,समता फाऊंडेशन मुबंई,गोदरेज फाऊंडेशन, लायन हेल्थ फाऊंडेशन व झोन चेअरपर्सन ,यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्राम पंचायत तळवली तर्फे अष्टमी व चिल्हे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून 30 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रियेला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला यात 115 रुग्णांची तपासणी तर 30 रुग्णांवर मोफत केली जाणार आहे नेत्र चिकित्सा या वेळी कोलाड रोहा लायन्सक्लबचे मार्गदर्शक तथा झोन चेअरपर्सन लायन रविंद्र घरत, कोलाड रोहा लायन्सक्लबचे अध्यक्ष डॉ सागर सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्याम लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग डॉ स्मिता चौगले,डॉ सायली केणी, सुजित पाटील,शुभम जाधव, चेतना पॅथॉलॉजीच्या डॉ समृद्धी राणे,श्रुती ऑप्टिकल कोलाडचे विठ्ठल सावळे,ग्राम पंचायत सरपंच सौ रुपाली कोस्तेकर,उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ रिया लोखंडे,मा.उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर,गावचे अध्यक्ष सुधीर लोखंडे,मंगेश लोखंडे, लायन नंदकुमार कळमकर, कल्पेश माने,राजेंदर कोप्पू,महेश तुपकर,सौ पूजा लोखंडे,जेष्ठ नागरिक गणपत शिंदे,सुरेश महाडिक, दगडू लाडगे,सह आदी मान्यवर व ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते ,
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना नेत्र तपासणीचा व त्यांच्यावरील मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी लायन्सक्लबचे सर्व पदाधिकारी अधिक परिश्रम घेऊन या भागात काम असल्याचे मनोगत लायन रविंद घरत लायन डॉ सानप ,डॉ स्मिता चौगले व गावचे अध्यक्ष सुधीर लोखंडे यांनी व्यक्त केले .तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ चिल्हे यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment