अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना पुन्हा तडाखा!
फळबाग कडधान्य पिक धोक्यात!
गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर ,
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!
कोलाड (श्याम लोखंडे ) सध्या बळीराजाच्या नशिबी सुगीचे दिवस नाहीच या ना त्या कारणाने बळीराजा कायम ग्रासला आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे संकट येतच आहेत तरी देखील सर्वांचीच भूक भागवण्याचे काम कवाड कष्ट करत तो भागवत असतो गेल्या मागील आठ पंधरा दिवसांपूर्वी चार ते पाच दिवस हवामान खात्याच्या अंदाजनुसार अवकाळी पाऊस कोसलला त्यात आता पुन्हा 1डिसेंबर पासून तीन ते चार दिवस हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या प्रमाणे रोहा तालुक्यात 1 डिसेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजल्या पासून सुरू झाल्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. असून शेतकरी- बागायतदारांच्या चिंतेत अधिक प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे तालुक्यात खरिपाच्या पिकानंतर शेतकरी कडधान्य व भाजीपाला पीक घेतात परंतु शेतात पाणी साचून राहिल्याने या पिकांवर पसरलेली अमरवेल व कीटक नाशकाचा पादुर्भावाचा आता मोठा धोका झाल्याने संपूर्ण कडधान्य पिकच वाया गेला जात असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांना चिंतेचे ग्रहण लागले असून याचा मोठा फटका सर्व सामान्य ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला बसला आहे तर गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उद्धभला जात आहे ,
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज पूर्वसूचनेनुसार दिनांक 1 डिसेंबर पासून पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळनार असे अंदाज व्यक्त केला त्या धर्तीवर पुन्हा अवकाळी वरुण राजा धडकला तसेच कोसळत असल्याने आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली त्यात काही शेतकऱ्यांच्या तर अक्षरशः खरीप हंगामातील भात शेतीचे साठून ठेवल्या मळण्या अद्याप त्यांची झोडणी मळणी न झाल्याने त्या उगड्यावर असल्याने भर पावसात भिजत असून पाणी साचल्याने त्या धानाची नासाडी होत आहे तर वेळोवेळी कोसळत असलेल्या या अवकाळी पावसामुळे संपूर्ण कडधान्य पीक वाया गेल्याने बळीराजाची चिंता वाढली असून तो हतबल झाला आहे
हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता मात्र हे अंदाज खरे ठरत असून सदरचा कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने भात पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले तर कडधान्य पिकांसह भाजी पाला लागवड व फळ बागायतदारांना मोठा नुकसान सोसावे लागणार असल्याचे दिसून येत आहे तर गुरांची वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आहे .
आता अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेले भात पिक भिजल्याने नुकसान झाले आहे.शेतात कडधान्य पेरलेल्या वाल,पावटा, चवळी, मटकी, मूग,तूर,चना, आदी. फळ भाजी-पाला व आंबा पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची चिंता आता सर्वत्र व्यक्त होत असून या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत अधिक वाढ झाली असल्याने बळीराचा चिंताग्रस्त झाला आहे,
तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी समाज सेवक व राष्ट्रीय छावा संघटना दक्षिण रायगड जिल्हा कार्यध्यक्ष नीलेशभाई महाडिक यांनी केली आहे .
Comments
Post a Comment