- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी आवाहन!
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह बोरघर हवेली येथे २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाबाबत!
तळा ( कृष्णा भोसले )कोरोना काळानंतर शासनाचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हे बोरघर हवेली तालुका क्रीडा संकुलाजवळ ता.तळा जिल्हा.रायगड या वसतिगृहात सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तरी मागासवर्गीय मुलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एस.एफ.कदम .गृहपाल यांनी केले आहे.
सदरच्या वसतिगृहाची मान्य संख्यां १००असुन या वसतीगृहात इयत्ता ८वी पासुन प्रवर्ग निहाय अनु.जाती ८०टक्के,अनु.जमाती ३टकके, विमुक्त भटक्या जाती, ५टक्के, आर्थिक व इतर मागासवर्गीय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी ३टक्के, विशेष मागास प्रवर्ग २टक्के, अनाथ २टक्के, अपंग ३टक्के , सदर वसतिगृहात गुणवत्ता नुसार प्रवेश दिला जाणार आहे.विदयार्थाकरिता मोफत निवास व्यवस्था,नाष्टा व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे.
दररोज सकाळी पोहे,शिरा,उपीट , आलटुन पालटुन तसेच उकडलेले दोन अंडी, एक सफरचंद,आणि ऋतुमानानुसार एक फळ,व दुध दररोज नाष्टयासाठी विनामूल्य दिला जातो.भोजन व्यवस्था दुपारी व सायंकाळी जेवण डाळ, भात,चपाती,भाजी,उसळ लोणचे,पापड सल्लाड,व आठवड्यातून दोन वेळा जेवण देण्यात येतो.
वसतिगृहात ८वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविली जातील.११ वी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रुपये ४०००रूपये शैक्षणिक साहित्य भत्ता दीला जातो.तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरीता रुपये ६००मासीकनिर्वाह भत्ता दिला जातो.शालेय व गणवेश पात्र विद्यार्थ्यांच्या खर्चाकरिता रुपये ६००मासीक निर्वाह भत्ता दिला जातो.शालेय व गणवेश पात्र विद्यार्थ्यांना दोन संचाकरीता गणवेश भत्ता, रेनकोट,छत्री,भत्ता दिला जातो.सदर त्यांचे भत्ते त्यांच्या बॅंक पासबुक खात्यात जमा करण्यात येतात.या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालयसुविधा, क्रीडा साहित्य, मनोरंजन इत्यादी साहित्य उपलब्ध आहेत.
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अनु.जाती जमातीसाठी २५०००० चे आत, विमुक्त भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, अपंग, अनाथ विद्यार्थी करिता १००,००० चे आत असणे गरजेचे आहे.
ऑफलाईन अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
सक्षम अधिकार्यांचेसहीचे २०२१-२०२२ मधील उत्पन्नाचे दाखले,जातीचे सक्षम अधिर्कार्यांचे सहीचे प्रमाणपत्रकाची सहीची प्रत, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रकाची सत्य प्रत,शाळा सोडल्याचा दाखला प्रत, बॅंक पासबुक झेरॉक्स,रहीवाशी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो दोन,अशी कागदपत्रे द्यावीत.
सन २०२१-२०२२ या वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेले आहेत.अधिक माहीतीसाठी कार्यलयिन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल एस. एफ.कदम यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment