अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा शेतात रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्याने बळीराजा चिंतातुर,
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात ऐन दिवाळीतच अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेली भात शेती तर काही ठिकाणी रचून ठेवल्या धानाच्या मळण्या भिजल्याने बळीराजा चिंतातूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
भारतात भाताचे कोठार म्हणून रायगडची नोंद आहे कोरोना संकटात येथील शेतकऱ्यांनी लॉक डाऊन काळात हजारांची झुजारं करून शेतीची मशागत तसेच कोणतेही हात मजुरी नसताना देखील हात उसनकी करून बी बियाणे आणून खरिपाची पेरणी केली आणि वेळेवर चांगला समाधानकारक पाऊस पडल्याने वेळेवर भात लागवडीचे कामे केली आज शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मोत्यासारखी कणसे समानधानकर भातपिक आल्याने बळीराजा सुखावला मात्र अवेळी आलेल्या पावसाने तो आता पूर्णतः दुखावला जात आहे.
रोहा तालुक्यातील धामणसई, देवकान्हे, खांब ,कोलाड परिसरात गुरुवार दि ४ व शनिवार दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी दोन दिवस सा. ४.०० वाजण्याच्या सुमारास जोरदार विजांचा कडकडाट आणि पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कोलाड खांब परिसरात दसरा सण संपताच भात कापणीसाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला होता परंतु परतीचा पाऊस येतो की काय यावकरता थांबला परंतु तद्नंतर समोर येत असलेला दिवाळीचा सण हे पाहता अनेकणांनी हात मजूर घेत भात कापणी झोडणीला सुरुवात केली मात्र अचानकपणे गुरुवार व शुक्रवारी रोजी सा. ४ वाजल्यापासून परतीच्या पावसाला जोरदार तडाखा अखेर बसला असुन शेतकऱ्यांचे उत्तम प्रकारे आलेले भाताचे पिक परतीच्या पावसामुळे भात शेतीत मोठया प्रमाणात पाणी साचून प्रचंड प्रमाणात रचलेल्या मळणीतील धानाचा नुकसान झाले आहे.अवखाली पडलेल्या पावसाने अनेक ठिकठिकाणी चांगल्या प्रकारे आलेल्या पिकाची माती केलेली दिसत आहे.शेतात पाणी साचल्याने रचलेल्या मळण्यांखाली गेल्याने धानाचे नुकसान झाले आले त्याला कोण योग्य हमीबभाव देईल का ? असा प्रश्न आता बळीराजा समोर पडला आहे. यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुभाव नंतर महापुराचा फटका यामध्ये बिबीयाणे व खतांची झालेली प्रचंड भाववाढ यात मजुरीत झालेली प्रचंड वाढ व कवडी मोलाचा बाजारात व्यापारी वर्ग देत असलेल्या भावाने विकला जाणारा बाजार भाव यांनी त्रस्त झालेला शेतकरी अतिरिक्त खर्च करुन आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीची कंबर कसून लागवड करतो परंतु त्याच्याच नशिबी असे फळ यावर माय बाप सरकार काही नुकसानभरपाई मिळेल का अशा प्रतीक्षेत बळीराजा आहे.
Comments
Post a Comment