पंढरपूर मध्ये तुफान पाऊस, विठ्ठल भक्तांची तारांबळ,
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) पंढरपूर मध्ये दोन दिवसापासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे विठ्ठल भक्तांची तारांबल उडाली असून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी व्यत्यय आला आहे.
कोरोनामुळे दोन वर्षापासुन सर्वत्र मंदिर बंद करण्यात आले होते परंतु दोन वर्षानंतर पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिर उघडून भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली. यामुळे यावर्षी विठ्ठल दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी दिसून आली. परंतु दि.१३/११/२१ व १४/११/२१ रोजी पंढरपूर मध्ये दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल भक्तांची तारांबळ उडाली असून बाजारपेठेत असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
या वर्षी शासनाने विठ्ठल दर्शनासाठी परवानगी दिल्यामुळे पंढरपूर मध्ये प्रचंड गर्दी होईल अशीच परिस्थिती निर्माण झाली यामुळे येथील व्यावसायिकांनी विविध प्रकारचा मोठया प्रमाणात माल भरला परंतु एसटी कर्मचारी वर्गाने संप पुकारल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी सर्वच भाविकांना पंढरपूरमध्ये येता आले नाही.यामध्ये तुफान पडलेल्या पावसामुळे विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांची तारांबल उडाली असून व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आले.
Comments
Post a Comment