खांब पालदाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच,एकाच दिवशी तीन विचित्र अपघात एक महिला गंभीर जखमी
कोलाड (श्याम लोखंडे ) मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्ग या मार्गावर भयानक पडलेले खड्डे आणि भयानक वाढलेले काटेरी झुडपे धोकादायक असलेले वळणे यामुळे आता पुन्हा प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतली असून काळ परवा एकाच दिवशी या मार्गावर भयानक तीन विचित्र अपघात घडले असून यात एक महिला अती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर सुदैवाने या अपघातात एक लहान मुलगी सुखरूप बचावलेचे सर्वत्र बोलले जात आहे,
या विषयी सविस्तर माहिती अशी की खांब पालदाड मार्ग हा दिवसंदिवस धोकादायक बनत आहे असे अनेकदा भाकीत केले होते या मार्गावर भयानक पडलेले खड्डे तसेच धोकादायक वळणे मार्गालगत वाढलेली मोठं मोठी काटेरी झुडपे यामुळे नेहमीच लहानसहान आपघात होतात परंतु मागील दोन दिवसांपूर्वी या मार्गावरील देवकान्हे पालदाड दरम्यान एकाच दिवशी वाहने समोरासमोर धडकल्याने दोन आपघात घडले तर एक छकडा बैल गाडी व टुव्हीलर अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली तर दैव बलवत्तर म्हणून एक लहान मुलगी सुखरूप बचावली तर जखमी झालेल्या महिलेवर उपचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत,
धानकान्हे देवकान्हे दरम्यातील व पालदाड पुलावरील खड्यांवर मागील काही दिवसांपूर्वी थातुरमातुर दुरुस्ती केली तर उदडवणे पालदाड पुलावरील खड्डे पुन्हा जैसे थे तसेच अर्धवट काटेरी झुडपे या मार्गावरील काढण्यात आली तर बाहे पालदाड या मार्गावरील काटेरी झुडपे न काढल्याने वळणावर होत आहेत आपघात याला जबाबदार कोण ? असा सवाल येथील ग्रामस्थ नागरिक करत आहेत या मार्गावरील अर्धवट काढलेली काटेरी झुडपे आता प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतली आहेत धोकादायक वळणं व भयानक वाढलेली काटेरी झुडपे यामुळे समोरील येत असलेले वाहनं दिसत नसल्याने दररोज आपघात होत आहेत
तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे ,
Comments
Post a Comment