समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
गोवे-कोलाड (विश्वास निकम)
तामसोली येथील रा, जि, प,शाळा येथे कोलाड शहारातील युवा नेते व समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे सोमवार दि:१५/११/२०२१ रोजी शैक्षणिक उपक्रम राबवून तामसोली येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वहया व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. .
समाजसेवक निलेश भाई महाडीक हे शिक्षणा विषयी जनजागृती व समाज विकासासाठी मोलाचे कार्यकरीत आहेत तसेच त्यांनी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राज्यस्तरावरील समाजरत्न पुरस्काराने ही सन्मानित केले आहे.
या वेळी समाजसेवक निलेशभाई महाडीक,प्रसाद खुळे, संजयदादा कनघरे, ईकिंदर शेवाले, गौरव नाईक,शाळेचे मुख्याध्यापक डाके सर यांच्या सह असंख्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment