गोवे येथील सामाजिक कार्यकर्ते खेळू दहिंबेकर यांचे दुःखद निधन
कै. खेळू दहींबेकर |
गोवे- कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी खेळू हरि दहिंबेकर यांचे शुक्रवार दि.५/११/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ५१ वर्षाचे होते.ते परोपकारी व प्रेमळ स्वभावाने सर्वाना परिचित होते. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.त्यांना लहान व थोर मंडळी खेळू मामा या नावाने हाक मारीत असत.ते धाटाव येथील एफडीसी कंपनीत कायमस्वरूपी नोकरी करीत होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या कुटूंबा वर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाटाव येथील एफडीसी कंपनीतील कामगार,सामाजिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,आई,एक मुलगा,चार मुली,बहिणी,पुतणे,भावजय,जावई,नातवंडे,व मोठा दहिंबेकर परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी एकाच दिवशी रविवार दि.१४/११/२०२१ रोजी त्यांचे पुतणे उत्तम दहिंबेकर यांच्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment