शिष्यवृत्ती परीक्षेत वडघर हायस्कूलचे सुयश! 

भूमी धुमाळ व श्रुष्टी पवार शिष्यवृत्ती प्राप्त!

सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!



माणगाव(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांनी 12 ऑगस्ट रोजी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे,ता.माणगाव ,जिल्हा- रायगड तथा कै.शंकर सिताराम विदया संकुलच्या कु.भूमी हरिश्चंद्र धुमाळ व कु.श्रुष्टी भिवा पवार या दोन विदयार्थ्यांनींनी शिष्यवती प्राप्त केली आहे . शाळेतून एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्या आहेत.
    या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली धारसे,शाळा समिती अध्यक्ष मा.श्री.महादेव जाधव, सदस्य विजय सावंत यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत हुशार, चाणाक्ष, जिज्ञासू, आज्ञाधारक,प्रामाणिक, उत्तम वक्तृत्व शैली अशा असंख्य गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनींचे मांजरवणे पंचक्रोशी व संपूर्ण तालुक्यातून शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन केले जात आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog