विनयभंग करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हूणन  चिरंजीवी संघटनेने दिले माणगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन 

    माणगाव (प्रतिनिधी)रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील  गोरेगाव जवळील कुशेडे गावात ८ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला म्हूणन  आरोपीवर कडक कारवाई व्हावी ह्यासाठी चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा नेहा भोसले व इतर कार्यकर्ते यांनी माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भेट दिली. तसेंच यापुढे असे प्रकार घडू नये ह्यासाठी प्रशासन व्यवस्था अजून मजबूत करावी असेही सांगितले.

   चिरंजीवी संघटना ही बाललैंगिक शोषण ,बालमजुरी,बालभिकारी, आणि बालविवाह, अशा अनेक विषयावर गेल्या ८ वर्षापासून काम करत आहे.संघटना ही रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करते.

   साकिनाका येथे घडलेले प्रकरण असेल,डोंबिवली येथील घडलेले प्रकरण ज्यात 9 महिने त्या मुलीवर बलात्कार होत राहिला. त्याचबरोबर नुकतच रायगड मधील गोरेगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचा एका ७५ वर्षाच्या माणसाने विनयभंग  केला ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. रोज  अश्या घटना ऐकून तळमळून उठायला होत, तरीही समाज मात्र झोपलेलाच आहे. ह्यावर कोणी आवाज उचलत नाही. आपण बालिकांचा रक्षणासाठी अशा  अत्याचारांवर आवाज उचलणं गरजेचं आहे. अशी माहिती चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी दिली.

   भारतभरामध्ये बलिकांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या बातम्या आपण रोजच पाहतो परंतु आपले दगड झालेले मन त्यासाठी भांडण म्हणून सांगत नाही.महिलांवर,लहान लहान मुलींवर होणारे हे अत्याचार थांबायला हवेत आणि त्यासाठी जनजागृती गरजेची आहे.असे राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी सांगितले.

   त्या नराधमांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे व असा प्रकार पुन्हा रायगड या विभागात होता कामा नये असे संघटनेची राज्याध्यक्ष नेहा भोसले यांनी सांगितले.त्यासंदर्भात माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भेटून कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  

Comments

Popular posts from this blog