विद्यार्थ्यांचें शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हूणन एस.टी. बस सुरु करणेबाबत कुमशेत परिसरातील ग्रामस्थांनी दिले माणगाव आगार प्रमुखांना निवेदन 


 रायगड (भिवा पवार)गोरेगाव येथे शाळा तसेच  महाविदयालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शिरवली,कुमशेत,ढाकशेळी, मांजरोने बाट्याचीवाडी, आंबेगाणी,वडघर मुद्रे,  या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साई- कुमशेत मार्गे गोरेगाव ही एसटी बस सुरू करावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी माणगाव आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.

याबाबत परिसरातील  ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कुमशेत, मौजे शिरवली, ढाकशेळी, शिरवली,      बाट्याचीवाडी, मांजरोने  वडघर आंबेगाणी या गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे गोरेगाव येथे शाळा व कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी  विद्यार्थी गोरेगाव जातात  कॉलेजची वेळी 7: वाजता असल्यामुळे त्यांना कॉलेजला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे विद्यार्थी शाळा कॉलेजला वेळेवर जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे.

गोरेगाव कुमशेत मार्गे मांजरोने साई ही एसटी बस ही 6:30 वाजता एसटी बस सेवा सुरू करावी यासाठी परिसरातील पालकांनी माणगाव आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक रामचंद्र भाऊराव देशमुख यांना निवेदन दिले असून यावेळी  कुमशेत ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश शिंदे,गोपाळ दाभेकर, सुरेश कडू, संतोष कडू, नागेश दाभेकर, शांताराम पवार रामदास सावंत, आदी पालक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही एस. टी. बस आम्ही लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन माणगाव आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी उपस्थित पालकांना दिले. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे लवकरात लवकर ही बस सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील पालकांकडून जोर धरत आहे.



Comments

Popular posts from this blog