महापुराच्या काळात मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणारे खरे योद्धे : खासदार सुनिल तटकरे
रोह्यात माणुसकीचा पुर गौरव सोहळा !
कोलाड (श्याम लोखंडे )गेल्या दोन वर्षात रायगड वासियांना कोरोना महामारी, निसर्ग चक्रिवादळ, तोक्ते चक्रिवादळ तसेच महाडमध्ये महापुराने थैमान घातले. 22 जुलै रोजी रात्रिच्या वेळी पावसाचा जोर वाढत असतानाच आ.अनिकेत तटकरे हाफ पँट घालून घराच्या बाहेर अंधा-या रात्री पडताच मी त्याला विचारले आता रात्री कुठे चाललास? त्यावर आ.अनिकेत तटकरे म्हणाले पावसाचा जोर वाढत आहे आणि महाडच्या नागरिकांना पुराचा विळखा बसत चालला आहे त्यांना ख-या अर्थाने मदतीची गरज आहे. त्यामुळे मी मदतीला बाहेर निघत आहे.माझी काळजी करु नका. त्याचबरोबर ना.अदिती तटकरे गुडघाभर पाण्यातून मदत कशी करता येईल याचा प्रयत्नात पुढे आली. अश्या परिस्थीतीत सकाळपासूनच मदतीचा ओघ महाडवासियांना सुरु झाला. त्यात पाण्याच्या बाटल्या, बुस्किटे प्रथम मदत पोहचत रायगडच्या तमाम सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणी दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले. या सर्वांची साथ घेत पुढे अनिकेत तटकरे आणी अदिती तटकरे पुरग्रस्थाना मदत करत होती.त्याचबरोबर चिखल व गाळ काढण्यासाठी स्वत: आ.अनीकेत तटकरे हाफ पँट घालून महाडमध्ये तळ ठोकून बसला होता. महाड वासियांना खरी गरज असताना महापुराच्या काळात मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणारे खरे योद्धे पुढे आले असे विधान खा.सुनिल तटकरे यांनी केले. "माणुसकीचा पुर" या कार्यक्रमाच्या गौरव प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मराठा समाज नेते प्रदीप आप्पा देशमुख, अनिल भगत, अनंत देशमुख, नंदू म्हात्रे, गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, नगरसेवक राजू जैन, महेंद्र गुजर, वरसे ग्रामपंचायत सरपंच नरेश पाटील, रामशेठ नाकती, रुपेश बामुगडे, महेश बामुगडे व सामाजिक संस्था पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, सन्मान स्विकारनारे दानशूर व्यक्तिमत्व व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
पुराने कोकण जलमय झाले असतानाच आपल्या माणसांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपतींचा मावळा अविश्रांत लढत राहिला असा माणुसकीचा पुर आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन ओम नम:शिवाय सभागृह किल्ला येथे रविवारी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आले होते.
यापुढे बोलताना खा.तटकरे म्हणाले कि, आ.अनिकेत तटकरे यांनी रोह्यात एक किलोमीटर आपला राष्ट्रध्वज फडकवून गिनिज बुकात नाव नोंदणीसाठी गेले. त्याचबरोबर 75 व्या स्वतंत्र दिनी रोह्यात 75 राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन तळागाळातील विविध व्यक्तींच्या हस्ते केले व समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. जे मलाही कधी सुचलं नाही. आताची पिढी खुप प्रगत आहे. देश प्रगती पथावर असताना युवापिढी संघर्षमय वातावरणातून पुढे येताना दिसते. रोहा तालुक्यातून भरघोस मदत महाड व चिपळूण वासियांना गेली. मात्र मी जेव्हा चिपळूणला गेलो तेव्हा तेथील नागरिकांनी खा. शरद पवार साहेबांना भेटायचे आहे असा टाहो फोडला होता. त्यांचे असे म्हणणे होते कि, मदत कशी मिळवून द्यायची हे खा.शरद पवारच जाणू शकतात. महत्वाचे म्हणजे येथील सर्व उपस्थीत शिख धर्मीय, सामाजिक संस्था, महिला मंडळ, दानशूर व्यक्तिमत्व यांनी केलेल्या मदतीने महाडकर सावरले.
Comments
Post a Comment