अलिबाग मध्ये शिक्षक सेनेकडून धरणे आंदोलन
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी वेतन पथक लेखाधिकारी यांना विविध प्रकारच्या मागण्यांसाठी निवेदने सादर
माणगाव( राजन पाटील ) माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे विविविध प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली बैनाडे ,माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे- पवार ,वेतन पथक वरिष्ठ अधिकारी प्रशांत तावडे ,,लेखाधिकारी कार्यालय अलिबाग यांना विविध प्रकारच्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आली.
यावेळी त्यांच्या समवेत शिक्षक सेना रायगडचे अध्यक्ष श्री .रविंद्र पाटील मुंब ई विभाग शिक्षक सेना सचिव लखिचंद ठाकरे ,उर्दु विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष फरिदूल काझी पेण तालुका अध्यक्ष सुरेश मोकल ,माणगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत आधिकारी ,उपाध्यक्ष नितीन नवगणे ,,रोहा तालुकाअध्यक्ष संजय गायकवाड ,जूनी पेन्शन हक्क संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष गजानन म्हात्रे ,अरूण पाटोळे ,प्रकाश भोईर ,माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयकुमार पारकर , उपाध्यक्ष राजेंद्र पवार ,सचिव अर्जुन कुशिरे ,हनुमंत म्हात्रे ,कांबळे सर ,जूनी हक्क पेन्शन संघटना माणगाव तालुकाअध्यक्ष राजन पाटील ,सचिव विद्याधर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बॉकेत व्हावेत ,वरिष्ठ वेतनश्रेणी - निवड श्रेणी ,रिक्त जागी शिक्षक देणे , पेन्शन फाईल त्वरित निकाली काढणे , आर .टी.ई .मान्यता तात्काळ देणे ,रोष्टर तपासणी शालार्थ आय.डी. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तात्काळ करणे ,1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पी .एफ .पुर्ववत चालू ठेवणे ,पी.एफ .च्या स्लीपा देणे ,जूनी पेन्शन संदर्भातील माहीती शासन दरबारी तात्काळ देणे ,पगार वेळेवर होणे आदी मागण्यांसाठीची निवेदने देण्यात आली.
Comments
Post a Comment