रोहा दिवा पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार सुनील तटकरे
रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा)
दिवा रोहा मेमू पॅसेंजर गाडी चालू करण्याबाबत व पूर्वीच्या गाड्या थांबत होते त्या गाडयांना रोहा रेल्वे स्थानक थांबा मिळणे आदी मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे . रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना रोहा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , उदय मोरे, महेंद्र मोरे , उल्लास मुद्राळे,विनोद सावरकर , विश्वनाथ जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन दिले या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे जिल्हा कार्याध्यक्ष मधूशेठ पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर नगराध्यक्ष संतोष पोटफोडे नगर परिषद सभापती समीर सकपाळ सभापती महेंद्र दिवेकर गट नेते महेंद्र गुजर शहर अध्यक्ष अमित उकडे सभापती पूर्वा मोहिते यांच्या सह नगरसेवक नगर सेविका व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या निवेदनाची व मागणीची दख्खल घेण्यात येईल यासाठी लोकसभेचे रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे साहेब रेल्वे मंत्री यांच्याकडे निश्चितच पाठपुरावा करतील तसेच लवकरच रेल्वे प्रशासन व अधिकारी यांची बैठक घेऊन या बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालय व प्रशासन अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून प्रवासी संघर्ष समितीच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले . २२/०३/२०२० रोजी कोरोना प्रादुर्भावामुळे दादर रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि दिवा रोहा पॅसेंजर बंद असून मुंबई इथे प्रवाश्याना ज्या अटी नियमानुसार लोकल ट्रेन सुरू केले असून, महत्वाचे सण आता सुरू होत असल्यामुळे मुंबई वरून कोकणात येणारे पनवेल पासून पुढे स्टेशन पेण, नागोठणे, रोहा, रत्नागिरी, सावंतवाडी येथील प्रवाश्याना कोकणात जाण्या - येण्यासाठी ह्या गाड्या तात्काळ चालू करण्याचे गरजेचे आहे.
तसेच रोहा स्टेशन दरम्यान पनवेल येथील नेहमीच कामगार वर्ग, नोकरी, व्यापारी, उद्योग धंदे, एम.आय.डी.सी. येथील कामगार यांच्या नियमित अप डाऊन करत असतात. तरी काही लोकांच्या कोरोना प्रादुर्भावामुळे नोकऱ्या गेल्या असून काही लोकांना टिकविण्याकरिता रोहा दिवा आणि कल्याण रोहा ह्या पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात याव्या अशी विनंती हि करण्यात आली असून गाड्या १५ दिवसात सुरू करण्याकरिता आम्ही रेल्वे प्रशासनावर वरील विषयी आपणाकडून कार्यवाही होण्यास आपल्याकडून पाठिंबा पत्र मिळण्याकामी आम्ही रेल्वे प्रवासी संघर्ष समिती लोकप्रतिनिधी व रेल्वेप्रशासनाला संघर्ष समितीने विनम्रपणे विनंती केली आहे.
Comments
Post a Comment