संजय दादा कणघरे यांना आदर्श युवक समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार
गोवे-कोलाड ( विश्वास निकम)
तामसोली गावचे आदर्श युवक, समाज सेवक , युवा सेना रोहा तालुका उपअधिकारी आणि तरुण तडफदार , धडाडीचा कार्यकर्ता तसेच क्रीडाक्षेत्रातील मानलेला हिरा मा, श्री, संजय दादा कणघरे यांना त्यांच्या एकंदरीत सर्व कामांबाबत व समाजसेवक बाबत मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने दखल घेऊन २०२०_२०२१ या वर्षीचा राज्यस्तरीय गुणजन गौरव महासम्मेलनात श्री संजय दादा कणघरे यांना राज्यस्तरीय आदर्श युवक, महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
कोरोणाचा पाश्वभूमीवर हा समारोह ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता, राज्यातील अनेक युवकांची या पुरस्कारामध्ये निवड झाली होती, त्या मध्ये तामसोली गावचे सुपुत्र श्री संजय दादा कणघरे यांची निवड झाली,
त्यांच्या या यशाबद्दल मा, श्री जिल्हा परिषद सदस्य किशोर भाई जैन मा, श्री युवासेना रायगड जिल्हाधिकारी सुधीर ढाणे, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, कट्टर शिवसैनिक निलेश भाई महाडीक, पेन विधानसभा महिला संघटीका दर्शना ताई जवके , उद्योजक सुमितजी काते , ईकिदंर शेवाले , कोलाड येथील दोस्ती चहाचे उद्योजक कामेश देवळेकर, प्रा,आमलपुरे सुर्यकांत आदिने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment