गाड्या अंगावर घालुन बळीराजाला चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध:-पालकमंत्री आदिती ताई तटकरे
गोवे कोलाड (विश्वास निकम)
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांवर गाड्या घालून बळीराजाला चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व इतर घटक पक्षांनतर्फे जाहीर निषेध करीत आहोत असे मत राज्य मंत्री तथा रायगडच्या पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आंबेवाडी नाका येथील महाराष्ट्र बंद च्या मोर्चाच्या वेळी आपले मत व्यक्त केले.
खिरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालुन क्रूर कर्माच्या वाईट भावनेने केलेल्या हत्तेच्या कटाचा आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असुन यापुढे आम्ही बळीराजावर करण्यात येणाऱ्या कोणत्याही अन्याय खपवून घेणार नाही.आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहू असे मत रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या महिला अध्यक्ष प्रितम पाटील, रोहा पंचायत समिती सदस्य सिद्धी रजिवले,आंबेवाडी जि.प.गट अध्यक्ष सुप्रिया जाधव, आंबेवाडी जि.प.गट अध्यक्ष नरेंद्र जाधव, खांब पं. स. गण अध्यक्ष समीक्षा घावटे, खांब पं. स. गण अध्यक्ष मनोज शिर्के, आंबेवाडी पं.स. गण अध्यक्ष विजय कामथेकर, खांब पं. स. गण अध्यक्ष शीतल बांगल,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,उपसरपंच श्रीकांत चव्हाण,गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे,उपसरपंच नितीन जाधव,युवा कार्यकर्ते राकेश शिंदे,संजय मांडळुस्कर, नरेंद्र पवार, संदीप जाधव,कुमार लोखंडे,तसेच खांब कोलाड विभागातील सर्व सरपंच उपसरपंच व सदस्य,असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment