श्री धाविर महाराज पालखी सोहळा शासनाच्या निर्बंधांनुसार व मास्क सेनेटाईजर लावूनच उत्साहात साजरा करा. खासदार सुनील तटकरे
रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा )
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्बंधांचे पालन करून व मास्क , सेनेटाईजर लावूनच आपल्या सह कुटुंबीयांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या आणि आपल्या ग्रामदैवत श्री धाविर महाराज पालखी सोहळा उत्साहात साजरा करा असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेला श्री धाविर महाराज पालखी सोहळ्याच्या शांतता कमेटीच्या सभेत केले . सदर सभेत पालक मंत्री आदिती तटकरे , जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर , आमदार अनिकेत तटकरे , जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे ,डी.वाय.यस.पी किरण कुमार सुर्यवंशी, तहसीलदार कविता जाधव, रोहा पोलीस निरीक्षक संजय पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील , श्री धाविर महाराज मंदिर विश्वस्त प्रशांत देशमुख, विजयराव मोरे , लालता प्रसाद कुशवाहा , मकरंद बारटक्के , यशवंत शेडगे , उपनगराध्यक्षा रिदवाना शेटे, नितीन शेठ परब, महेश कोल्हाटकर, गट नेते महेंद्र गुजर, सभापती महेंद्र दिवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित घाग , अप्पा देशमुख , सुभाष राजे , स्वप्निल धनावडे आदी सह बहुसंख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांना रोहाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज पालखी सोहळा विषयी माहिती देताना म्हणाले श्री धाविर महाराज पालखी सोहळ्याच्या वेळी श्री धाविर महाराजांची पालखी पुर्ण शहरात जवळपास 15 किलो मीटर ठरलेले मार्गानं मार्गक्रमण करत प्रत्येकाच्या दारा समोर जाते रोहे करांच्या दारा समोर पालखी आले नंतर रोहेकर भक्ती भावाने पुजा अर्चा करतात पण गेल्या वर्षी कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमानुसार पालखी कुठे ही ना थांबता पुजा अर्चा ना करतातच चार तासचे आत पालखी मंदिरात नेण्यात आली होती तरी जिल्हाधिकारींना ग्रामस्थांच्या वतीने माझी विनंती आहे की या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आहे म्हणून शासनाच्या नियमानुसार निर्बंधांचे पालन करत पालखी सोहळा मागील प्रमाणे करण्याची लेखी परमिशन द्यावी या नंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आपल्या भाषणात म्हणाले कोरोना संपला नाही रोहा तालुक्यात आत्ताच काही दिवसांपूर्वी एक रुग्ण होता दोन झाले तीन झाले चार झाले कालच्या रिपोर्ट प्रमाणे आत्ता सहा कोरोना रुग्ण आहे तर आत्ता सहा चे साठ रुग्ण होऊ नये मी लेखी परमिशन देतो पण शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करुनच पालखी सोहळा साजरा करण्याची परमिशन देत आहे हे तुमच्या आरोग्या सह तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले होईल म्हणून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मास्क, सेनेटाईजर लावूनच उत्साहात पालखी सोहळा साजरा करा .
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाले आदी शक्तीच्या नवरात्र उत्सव दरम्यान दिनांक 10/10/2021 रोजी संपुर्ण जिल्ह्यात फक्त महीलांसाठी लसी करण मोहीम राबविण्यात येईल. पालक मंत्रीनी सुद्धा शासनाच्या नियमांची माहिती आपल्या भाषणात दिली .
त्याच प्रमाणे रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी या पालखी सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहणार आहे नेहमी प्रमाणे चोख बंदोबस्त ठेवला जाईल तरी पण विश्वस्त मंडळाने स्वयं सेवकांची एक मोठी टीम तयार करावी त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख राहील
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी सुद्धा शासनाच्या नियमा विषयी माहिती दिली, विश्वस्त मंडळाच्या वतीने मकरंद बारटक्के यांनी सांगितले की पालखी सोहळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मास्क सेनेटाईजर लावूनच साजरा केला जाईल असी मी विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्वांचे आभार मानतो.
Comments
Post a Comment