रोहा तालुक्यातील शिक्षकांनी केला शिक्षक अजय कापसेंचा सन्मान ,

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अजय कापसे (निमंत्रित सदस्य ,रा जि प जिल्हा शिक्षण व क्रीडा समिती) यांचा रोहा तालुका वरिष्ठ वेतनश्रेणी गट व शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अजय कापसे यांची रायगड जिल्हा शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्या नंतर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची विविध प्रलंबित असलेली कामे मार्गी लागले आहेत.यात प्रामुख्याने वरिष्ठ वेतनश्रेणी , मेडिकल बिल, पदवी परवानगी, भविष्य निर्वाह निधी सह प्रकरणे व इतर कामे अतिशय जातीने लक्ष घालून जिल्हा परिषदेतून पूर्ण केले आहेत ,तसेच विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न संदर्भात सातत्याने मेहनत घेऊन ते काम निस्वार्थ भावनेने व प्रामाणिकपणे पूर्णत्वास घेऊन जात आहेत.त्यामुळे तालुक्यातील रोहा तालुक्यातील शिक्षक मंडळींनी अजय कापसे सरांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.व त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत सन्मान कर्तृत्वाचा म्हणून शिक्षक अजय कापसे (निमंत्रित सदस्य ,रा जि प जिल्हा शिक्षण व क्रीडा समिती) यांचा सन्मान रोहा तालुका वरिष्ठ वेतनश्रेणी गट व शिक्षकांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.

अजय कापसे सरांची जिल्हा शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्या पासून जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागले आहेत.यात वरिष्ठ वेतनश्रेणी ,मेडिकल बिल, पदवी परवानगी, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे व इतर कामे अतिशय जातीने लक्ष घालून जिल्हा परिषदेतून पूर्ण केले आहेत ,तसेच विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्ना संदर्भात सातत्याने मेहनत घेऊन ते काम निस्वार्थ भावनेने पूर्णत्वास घेऊन जात आहेत.या संदर्भात रोहा तालुक्यातील शिक्षक मंडळींनी अजय कापसे सरांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.         

सदरच्या सत्कार सोहळ्याला यावेळी उत्तर देताना कापसे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटना,आ. अनिकेतभाई तटकरे,राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु. आदितीताई तटकरे यांनी जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीत जिल्ह्यातील शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करण्याची दिलेली संधी या बद्दल मनस्वी आभार व्यक्त केले. तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण याविषयीचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण, क्रीडा व आरोग्य सुधाकरजी घारे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासन यांचे सहकार्य यामुळे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी मदत होते. जिल्हा परिषद शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचा शैक्षणिक उन्नतीकरिता यापुढेही मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सदैव कार्यरत आहे व सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभावे असे आवाहन यावेळी केले. 

यावेळी कोलाड,नागोठणे,चनेरा, रोहा विभागातील शिक्षक प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत वरखले, गजानन जाधव, किशोर जाधव, सचिन मुसळे, जयेश महाडिक, घनश्याम अनभुले, समीर पठाण, जगन्नाथ अब्दागिरे, किसन शिंदे, बाळासाहेब चिंचोले,सौ.लीना खराडे, सौ.योगिता पाष्टे, सौ.मीनाक्षी पोटफोडे, हाके, तिपुळे, ढाकणे,अशोक राठोड,, अजित भंडारे,सौ.कापसे आदी सर्व शिक्षक उपस्थित होते.

उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आदी प्रतिनिधिनी शिक्षक अजय कापसे यांच्या बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog