सुकेळी येथून मोबाईल चोरीला चोराचा फोटो कॅमेऱ्यात कैद
हाच तो मोबाईल चोरी करून गेलेला चोर कॅमेरात कैद गोवे-कोलाड (विश्वास निकम ) |
सुकेळी येथील आशिर्वाद पान शॉप येथून रेलमी सी.२५ हा १००००रु. किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला असून चोरट्याचा फोटो कॅमेऱ्या कैद झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि बुधवार दि.२० ऑक्टोबर रोजी सुकेळी येथील जिंदल कंपनी समोर असणाऱ्या आशिर्वाद पान शॉप येथून सुनिल कुमार उर्फे दिप कुमार यांचा रेलमी सि.२५ हा १०००० रु. (दहा हजार रु.) किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला आहे.त्याचा फोटो कॅॅमेऱ्यात कैद झाला.हा मुलगा दोन दिवसपूर्वी आशिर्वाद हॉटेल येथे कामाला आला होता.तो आपले कपडे घरून घेऊन येतो.असे कारण सांगून मोबाईल लंपास करुन गेला. हा मुलगा इंदापूर तळा या भागातील असुन त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. परंतु फोटो मधील मुलगा जर कोणाला दिसुन आला तर सुकेळी आशिर्वाद पान येथील सुनील कुमार यांच्या संपर्क साधावा असे सांगण्यात येत आहे.
दिवसेंदिवस चोरी व घरफोडी यांचे प्रकार वाढत चालले असून कोणी अनोळखी व्यक्तीला कामावर ठेवण्यासाठी कमीत कमी त्या व्यक्तीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र असल्याशिवाय कामावर घेऊ नये.यामुळे अशा चोऱ्या व घरफोड्या होण्याचे प्रमाण कमी होतील.
Comments
Post a Comment