आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा आंबेवाडीनाका व आंबेवाडी शाळेत बिस्किटे व मास्कचे वाटप

कोलाड  (प्रतिनिधी)   विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळाआंबेवाडी नाका, तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेवाडी गाव या शाळांमध्ये रितेश ( बंटी) पलंगे, व पलंगे परिवारा मार्फत विद्यार्थ्यांना बिस्किटे व मास्क चे वाटप करण्यात आले. या वेळी शुभागी पलंगे आंबेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच,  सुरेश महाबळे सरपंच आंबेवाडी ग्रामपंचायत  तसेच रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा प्रीतम पाटील,अवि पलंगे,ग्रा.सदस्यआंबेवाडी कुमार लोखंडे ग्रामपंचायत सदस्य आंबेवाडी,श्रीकांत चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत आंबेवाडी, वृषाली लोखंडे सदस्य आंबेवाडी ग्रामपंचायत, राकेश लोखंडे, चंद्रकांत बाईत, मोरे, ग्रामस्थ उपस्थित होते.

         कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान परिषदेचे आमदार.अनिकेत सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात कोरोना काळातील गरज ओळखून विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.तर यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम नियोजन रायगड परिषद जिल्हा परिषद शाळा  आंबेवाडी नाका, व जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी गाव शाळेतील  सौ.अलका सानप मॅडम, मेघा देवकर मॅडम, सुप्रिया पवार मॅडम, माधुरी मुखेकर मॅडम, यांनी केले होते. सदर कार्यक्रम नियोजनबद्ध व उत्तम रीतीने पार पाडला. 


Comments

Popular posts from this blog