रोह्यात भरले छोटेखानी कविसंमेलन,
जुन्या आठवणींना उजाळा
रायगड (भिवा पवार )
मोबाईल मुळे अनेक लोक जोडले गेले खरे परंतु इंटरनेटच्या मायाजालात मध्ये माणूस पूर्णपणे गुरफटला आहे. पूर्वीसारखा समोरासमोर संवाद होत होता तो मात्र दुरावला आहे. प्रत्येक कार्यक्रमात व शुभ प्रसंगी माणूस हजर राहत होता पण आता मात्र माणूस मोबाईल इंटरनेटच्या सहा यांनी साहाय्याने व्हाट्सअप, फेसबुक ट्विटर अशा अनेक माध्यमातून संदेश पाठवत आहे.त्या मुळे पूर्वीसारखी माया, आपुलकी, प्रेम,भावना, लोप पावत आहे केवळ मोबाईल वरच नाते राहिले आहे पुढच्या पिढीला आपली लोक कोण आहेत ती माहीत पडणार नाहीत नातेसंबंध संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे पण याला अपवाद आहे तो रोहा येथील कवी बंधूचा रोहा येथिल जुने सर्व कवीनीं एकत्र येऊन एक छोटेखानी कवी संमेलन भरवून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या नव नविन कविता, गझल, चारोळी, आशयघन कविता, एकमेकांना ऐकविल्या. काल एक छोटेखानी संम्मेलन रोह्याचे जेष्ठ साहित्यीक,पत्रकार श्रीनिवास गडकरी यांचे निवासस्थानी घेण्यात आले वेळातवेळ काढून मोजके कवी या संमेलनात जमले होते. गझल,चारोळ्या, आणि आशयघन कवितांचे वाचन या समयी झाले श्रीनिवास गडकरी यांच्या मातोश्री निवृत्त जेष्ठ शिक्षिका यांनी देखील कविनां प्रोत्साहन, उत्स्फूर्त प्रतीसाद देऊन कविंचा ऊत्साह वाढवला. रोह्याच्या सांस्कृतिक वातावरणात नवा रंग भरणा-या या कवी संम्मेलनामधे महाराष्ट्रात सुपरिचित असलेले गझलकार हनुमंतजी शिंदे, जूने व्रुत्तपत्रलेखक,कवी सुधिरजी क्षिरसागर, जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास गडकरी आणि राजेश हजारे उपस्थित होते या आगळ्या, वेगवेगळ्या संम्मेलनाने कविंच्या कविता सादरीकरणाने जेष्ठ शिक्षिका श्रीमती गडकरी बाई यांनी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. व या संम्मेलनाची सांगता करण्यात आली. सदर संमेलन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती गडकरी बाई यांच्या उपस्थितीत झाला.
Comments
Post a Comment