सोनाली वाचकवडे यांची रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती


                                गोवे -कोलाड (विश्वास निकम )

           रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक किल्ला येथे संपन्न झाली. यावेळी पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने तसेच आगामी येणाऱ्या निवडणुका याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत कोलाड आंबेवाडी येथील सौ. सोनाली राजेंद्र वाचकवडे यांची रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्ती पत्रक खासदार सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, सुरेश मगर, नारायण धनवी, रामचंद्र चितळकर, शिवराम शिंदे, सुरेश महाबळे, रिजवान शेटे, भाई टके, महेंद्र गुजर, शहराध्यक्ष प्राजक्ता चव्हाण, अध्यक्ष जयवंत मुंढे, सौ. पाटील, तसेच राष्ट्रवादीचे विविध परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहा तालुका महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सोनाली वाचकवडे यांनी सांगितले की खासदार सुनिलजी तटकरे, पालकमंत्री आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझी निवड केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी असून पक्ष वाढविण्यासाठी मी प्रामाणिक पणे जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष प्रत्येक वाड्यांमध्ये कसा वाढेल यासाठी सदैव प्रयत्न करेन.

Comments

Popular posts from this blog