लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाची सामाजिक बांधिलकी खांब देवकान्हे धामणसई येथील रिक्षांना केले कर्टनचे वाटप 


                     कोलाड  (श्याम लोखंडे)   रोहा तालुक्यातील लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या सामाजिक बांधिलकीतुन खांब धानकान्हे व देवकान्हे रोहा तसेच मुठवली धामणसई ते रोहा या मार्गावर सातत्याने धावणाऱ्या रिक्षांना कोरोना संसर्ग रोखण्याकरिता रिक्षा चालक आणि पॅसेंजर यांच्या मध्ये लावण्याकरिता कर्टन्स तसेच आपत्कालीन अपघातात प्राथमिक उपचारासाठी फस्टेड बॉक्स किटचे यावेळी वाटप करण्यात आले ,

2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट 3231 A 2 रिजन थ्री झोन टू सन 2021/22 लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चा सेवा सप्ताह दरम्यान रिक्षाना कार्टन व फस्टेड बॉक्स किटचे वाटप व विविध उपक्रम करण्यात आले ,


यावेळी खांब येथील डॉ बाळजीराव वाखरकर यांच्या शुभहस्ते व लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे प्रेसिडन्ट डॉ सागर सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पॅसेंजर रिक्षांना हे कर्टन वाटप करण्यात आले यावेळी क्लबचे सेक्रेटरी लायन रवींद्र लोखंडे ,खजिनदार डॉ श्याम लोखंडे ,महेश तुपकर,दिनकर सानप,केशव माने,आदी लायन्स मेंबर व सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकर,सुटे,किशोर भोईर,उपस्थितीत रिक्षा चालक मालक महेश कचरे, संजय सानप , संतोष कचरे ,चंद्रकांत लाडगे,सुनील वरखले, कुमार गोडबोले, सचिन जाधव,रामचंद्र मोरे,गणेश महाडिक, तेजेश भोईर, मंगेश ठाकूर,रोहिदास कोल्हटकर, मुयुर हरिश्चंद्र कोल्हटकर, प्रशांत मसूक् सुटे, किशोर भोईर,ज्ञानदेव मालुसरे, सह 40 रिक्षांना यावेळी हे कर्टन वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog